पाच हजार विद्यार्थ्यांनी दिली सेट परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 12:22 AM2018-01-29T00:22:07+5:302018-01-29T00:22:24+5:30
उच्च शिक्षण प्राप्त केल्यानंतर प्राध्यापक होण्यासाठी शहरातील विविध १३ केंद्रांवर पाच हजार २८५ विद्यार्थ्यांनी रविवारी (दि.२८) राज्यस्तरीय पात्रता चाचणी परीक्षा (सेट) दिली. सर्व परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा सुरळीत पार पडली. परंतु, परीक्षेत विचारण्यात आलेल्या प्रश्नांची काठिन्य पातळी आणि अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्नांमुळे सेट परीक्षा अवघड गेल्याची प्रतिक्रिया परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
नाशिक : उच्च शिक्षण प्राप्त केल्यानंतर प्राध्यापक होण्यासाठी शहरातील विविध १३ केंद्रांवर पाच हजार २८५ विद्यार्थ्यांनी रविवारी (दि.२८) राज्यस्तरीय पात्रता चाचणी परीक्षा (सेट) दिली. सर्व परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा सुरळीत पार पडली. परंतु, परीक्षेत विचारण्यात आलेल्या प्रश्नांची काठिन्य पातळी आणि अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्नांमुळे सेट परीक्षा अवघड गेल्याची प्रतिक्रिया परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. शिक्षण क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा बाळगून वरिष्ठ महाविद्यालयात किंवा विद्यापीठामध्ये सहायक प्राध्यापक होऊ इच्छिणाºया विद्यार्थ्यांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे शहरातील १३ केंद्रांवर राज्यस्तरीय पात्रता चाचणी (सेट) परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी ८३ टक्के उमेदवारांची उपस्थिती होती. परीक्षेसाठी एकूण सहा हजार ३७९ परीक्षार्थींपैकी पाच हजार २८५ विद्यार्थी प्रविष्ट होते. तर १०९४ परीक्षार्थींनी परीक्षेला दांडी मारली. मुक्त विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे, सहायक समन्वयक परेश शिऊरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व केंद्रांवर परीक्षा सुरळीत पार पडली. मात्र या परीक्षेत प्रश्नांची काठिन्य पातळी वाढविण्यात आल्याने पहिला पेपर अवघड गेल्याची प्रतिक्रि या परीक्षार्थींनी दिली आहे. सेटचा पहिला पेपर जनरल नॉलेज १० ते ११.१५ या वेळेत तर दुसरा संबंधित विषयाचा पेपर ११.४५ ते १ आणि तिसरा संबंधित विषयाचा पेपर २.३० ते ५ या वेळेत घेण्यात आला.
पहिल्या समावेशक विषयाच्या पेपरमध्ये अवघड प्रश्न विचारण्यात आल्यान परीक्षार्थींना पेपर अवघड गेला, तर विशिष्ट विषयांशी संबंधित पेपरमध्ये काही प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील असल्याने हे पेपरही अवघड होते. परंतु बहुपर्यायी स्वरूपाच्या प्रश्नांमुळे पेपर वेळेत पूर्ण झाले. - अश्विनी आडके, सेट परीक्षार्थी