शहरात मास्क न लावणाऱ्यांना पाचपट दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:16 AM2021-02-24T04:16:09+5:302021-02-24T04:16:09+5:30
नाशिक शहरात काेरोनाबाधितांची संख्या जानेवारी महिन्यापर्यंत नियंत्रित होती. मात्र नंतर आता त्यात वाढ होऊ लागली आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या ...
नाशिक शहरात काेरोनाबाधितांची संख्या जानेवारी महिन्यापर्यंत नियंत्रित होती. मात्र नंतर आता त्यात वाढ होऊ लागली आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या सहाशेपर्यंत आली असताना आता मात्र ती दीड हजारावर गेली आहे. आराेग्य नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याने कोरोना संसर्ग वाढत असल्याने गेल्या रविवारी (दि.२१) पालकमंत्री छगन भुजबळ यांनी घेतलेल्या बैठकीत यंत्रणांना कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच मास्क न घालणाऱ्या आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना दोनशे रुपयांऐवजी पाचशे रुपयांचा दंड वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानंतर नाशिक महापालिकेच्या वतीने एक हजार रुपये दंड आकारण्याची अधिसूचना आयुक्त कैलास जाधव यांनी काढली. त्याची मंगळवारपासून (दि.२३) शहरात अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली आहे. दिवसभरात १२७ नागरिकांकडून १ लाख २७ हजार रुपये दंड वसूल करण्यात आल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या संचालक डॉ. कल्पना कुटे यांनी दिली.
दरम्यान एक हजार रुपये दंड ही रक्कम अत्यंत जास्त असून, ती कमी करण्याची मागणी मंगळवारी (दि.२३) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत करण्यात आली. त्यानुसार आयुक्तांना कळवण्यात येईल, असे सभापती गणेश गिते यांनी सांगितले.
इन्फेा...
अशी झाली दंडवसुली...
विभाग प्रकरणे वसूल दंड
नाशिकरोड २९ २९,०००
पश्चिम ११ ११,०००
पूर्व ४५ ४५,०००
सिडको ११ ११,०००
पंचवटी १६ १६,०००
सातपूर १५ १५,०००