प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे पाच रेल्वे गाड्या केल्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 10:55 PM2021-05-17T22:55:20+5:302021-05-18T00:04:21+5:30

मनमाड : प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने पाच प्रवासी गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

Five trains canceled due to poor response from passengers | प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे पाच रेल्वे गाड्या केल्या रद्द

प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे पाच रेल्वे गाड्या केल्या रद्द

Next
ठळक मुद्देपुढील सूचना मिळेपर्यंत रद्द करण्यात आली

मनमाड : प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने पाच प्रवासी गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

ट्रेन नंबर ०२१६९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - नागपूर दैनिक विशेष यात्रा आरंभ दिनांक २० मेपासून आणि ट्रेन नंबर ०२१७० नागपूर - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दैनिक विशेष यात्रा आरंभ दिनांक १९ मेपासून पुढील सूचना मिळेपर्यंत रद्द करण्यात आली आहे. ट्रेन नंबर ०२१५३ लोकमान्य तिलक टर्मिनस - हबीबगंज साप्ताहिक विशेष यात्रा आरंभ दिनांक २७ मेपासून आणि ट्रेन नंबर ०२१५४ हबीबगंज - लोकमान्य तिलक टर्मिनस साप्ताहिक विशेष यात्रा आरंभ दिनांक २८ मेपासून पुढील सूचना मिळेपर्यंत रद्द करण्यात आली आहे.
तसेच गुजरातमधील चक्रीवादळाच्या सतर्कतेमुळे ट्रेन नंबर ०८४०२ डाऊन ओखा - पुरी विशेष यात्रा आरंभ दिनांक १९ मे रोजी रद्द करण्यात आली आहे. प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. (१७ मनमाड)

Web Title: Five trains canceled due to poor response from passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.