सटाणा तहसीलच्या पथकाने पकडली चोरट्या वाळूने भरलेली पाच वाहने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 06:09 PM2018-12-11T18:09:13+5:302018-12-11T18:09:49+5:30
सटाणा : येथील तहसील विभागाच्या वाळू तस्करी विरोधी पथकाने दोन दिवसात चोरटी वाळूची वाहतूक करणाऱ्या चार ट्रक व एक ट्रॅक्टर अशी पाच वाहने पकडून दंडात्मक कारवाई केली.
सटाणा : येथील तहसील विभागाच्या वाळू तस्करी विरोधी पथकाने दोन दिवसात चोरटी वाळूची वाहतूक करणाऱ्या चार ट्रक व एक ट्रॅक्टर अशी पाच वाहने पकडून दंडात्मक कारवाई केली.
वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी बागलाणचे तहसीलदार प्रमोद हिले यांनी स्वत: बाळू तस्करी विरु द्ध पथक तयार केले असून गेल्या महिन्यापासून धडक मोहीम हाती घेतली आहे. या पथकाने गेल्या दोन दिवसात चिराईबारी, नामपूर, लखमापूर रस्ता तसेच वीरगाव नजीक कान्हेरी नदीपात्रात सापळा रचून चार ट्रक आणि एक वाळूची चोरटी वाहतूक करणारा ट्रॅक्टर अशी पाच वाहने पकडली.
पथकातील कर्मचारी मेजर मच्छिंद्र मोरे यांना कान्हेरी नदीपात्रात ट्रॅक्टरने वाळूची तस्करी सुरु असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार मोरे यांनी वीरगाव नजीक सापळा रचून जॉनिडयर कंपनीचा ट्रक्टर (एमएच ४१ ए ए ३१९६) चोरटी वाहतूक करतांना रंगेहाथ पकडले. पथकाने वाळूसह ट्रॅक्टर जप्त केला असून १ लाख ३० हजार रु पये दंड ठोठावला आहे.
दरम्यान चिराईबारी मार्गे साक्र ी-लखमापूर या मार्गाने वाळूची मोठ्या प्रमाणात तस्करी सुरूच आहे. नंदुरबार कडून तापी नदीतून बेकायदा वाळूचा उपसा करून नाशिक, मुंबईकडे मोठ्या प्रमाणात वाळूची चोरटी वाहतूक केली जात आहे. याला चाप लावण्यासाठी चिराईबारी तसेच नामपूर लखमापूर रस्त्यावर भरारी पथके ठेवण्यात आले आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास ट्रक (एमएच १८ बीजी ७५२७), (एमएच १५ सीके ८३१०), (एमएच ४१ जी ७३७०) हे ट्रक चिराईबारी मार्गे वाळूची चोरटी वाहतूक करतांना आढळून आले. दोन वाहने पथकाला पकडण्यात यश आले. मात्र दोन वाहने पळून जाण्याच्या प्रयत्नात असतांना सिनेस्टाईल पाठलाग करून लखमापूर नजीक पकडण्यात यश आले. या चारही वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून सुमारे साडे सात लाख रु पये दंडात्मक कारवाईची नोटीस संबधितांना बजावण्यात आली आहे.