सिन्नरच्या ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात पाच व्हेंटिलेटर्स कार्यान्वित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2020 04:17 PM2020-09-27T16:17:09+5:302020-09-27T16:18:16+5:30
सिन्नर : तालुक्यात कोरोना रुग्णांना जीवदान देण्याचा अहोरात्र प्रयत्न करर्णाऱ्या ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातील डेडिकेटेड कोविड केअर सेंटरमध्ये व्हेंटिलेटर्सचे काम करण्यारे पाच हाय आॅक्सिजन सप्लायर मशीन कार्यान्वित करण्यात आले आहे.
सिन्नर : तालुक्यात कोरोना रुग्णांना जीवदान देण्याचा अहोरात्र प्रयत्न करर्णाऱ्या ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातील डेडिकेटेड कोविड केअर सेंटरमध्ये व्हेंटिलेटर्सचे काम करण्यारे पाच हाय आॅक्सिजन सप्लायर मशीन कार्यान्वित करण्यात आले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय मदतीची वाट न बघता औद्योगिक कंपन्यांचे सीएसआर निधी, देणगी व लोकसहभागातून ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात डेडिकेटेड कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले होते. सुरुवातीला केवळ इमारत स्वरूपात असलेल्या या रुग्णालयात बघता-बघता सुविधांची जमवाजमव होऊ लागली आणि कोरोनाग्रस्तांवर यशस्वी उपचार सुरू झाले. आॅक्सिजन सप्लायची व्यवस्थाही करण्यात आली. या रुग्णालयात अतिदक्षता विभागाची स्वतंत्र व्यवस्था नसल्याने अतिगंभीर रुग्णांवर उपचार करण्यास अडचणी येत होत्या. राज्यभरातील रुग्णालयांना शासनाकडून व्हेंटिलेटर्स प्राप्त झाल्यानंतर सिन्नर उपजिल्हा रुग्णालयालाही १५ युनिट प्राप्त झाले होते. तथापि रुग्णालयात अतिदक्षता विभाग तसेच तंत्रज्ञाचा अभाव असल्याने ही सुविधा सुरू करण्यात अडचणी येत होत्या. अतिगंभीर रुग्णांचे हाल होऊ नयेत यासाठी १५ पैकी १० युनिट एसएमबीटी रुग्णालयास देण्यात येऊन ते सिन्न तालुक्यातील अतिगंभीर कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी वापरात होते, तर उर्वरित ५ युनिट पडून होते.
पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत आढावा बैठकीत आमदार माणिकराव कोकाटे, जि. प. सदस्य सिमंतिनी कोकाटे यांनी ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात व्हेंटिलेटर्स कार्यान्वित करण्यात येणाºया अडचणींबाबत तसेच जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे ग्रामीण रुग्णालयात अतिदक्षता विभाग सुरु करण्यासंदर्भात चर्चा केली. त्यानंतर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातील डेडिकेटेड कोविड केअर सेंटरमध्ये पाच हाय आॅक्सिजन सप्लायर युनिट कार्यान्वित करण्यात आले. लवकरच या रुग्णालयात अतिदक्षता विभागाच्या सुविधा सुरू होणार असल्याची माहिती कोकाटे यांनी दिली.
सिन्नरच्या ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात डेडिकेटेड कोविड केअर सेंटरमध्ये पाच हाय आॅक्सिजन सप्लायर युनिट कार्यान्वित करण्यात आले. (२७ सिन्नर १)