जिल्ह्यात तब्बल पाच बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2021 01:42 AM2021-11-26T01:42:48+5:302021-11-26T01:43:38+5:30
जिल्ह्यात तब्बल दाेन महिन्याच्या कालावधीनंतर अचानकपणे कोरोनाच्या पाच बळींची नोंद झाली आहे. त्यात चार मृत्यू नाशिक ग्रामीणचे, तर १ नाशिक शहरातील असून, एकूण बळींची संख्या ८७१५वर पोहोचली आहे.
नाशिक : जिल्ह्यात तब्बल दाेन महिन्याच्या कालावधीनंतर अचानकपणे कोरोनाच्या पाच बळींची नोंद झाली आहे. त्यात चार मृत्यू नाशिक ग्रामीणचे, तर १ नाशिक शहरातील असून, एकूण बळींची संख्या ८७१५वर पोहोचली आहे.
जिल्ह्यात गुरुवारी एकूण ६३ नागरिक कोरोनामुक्त झाले असून, ५१ रुग्ण नव्याने दाखल झाले आहेत. नवीन रुग्णांपैकी ३७ नाशिक मनपा, १२ नाशिक ग्रामीण, तर मालेगाव आणि जिल्हाबाह्य प्रत्येकी एक अशी रुग्णसंख्या आहे. दरम्यान, जिल्ह्यातील कोरोना उपचारार्थींची रुग्णसंख्या ४६३ झाली असून, प्रलंबित अहवालांच्या संख्येत वाढ होऊन ९६६वर पोहोचली आहे. जिल्ह्यातील बळींच्या संख्येत अचानकपणे वाढ झाली आहे. मात्र, ही वाढ अशीच कायम राहिल्यास आरोग्य विभागाच्या वतीने तो चिंतेचा विषय ठरला आहे.