पाच गाव पाणीपुरवठा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 08:32 PM2020-06-06T20:32:04+5:302020-06-07T00:48:46+5:30

सिन्नर तालुक्यातील भोजापूर खोरे परिसरात बुधवारी झालेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या जोरदार तडाख्यामुळे धरण परिसरात मोठ्या प्रमाणावर वीज तारा तुटल्याने व विजेचे खांब कोसळल्याने कणकोरीसह पाचगाव नळपाणी पुरवठा योजना चार दिवसांपासून ठप्प झाली आहे.

Five villages have no water supply | पाच गाव पाणीपुरवठा ठप्प

पाच गाव पाणीपुरवठा ठप्प

Next
ठळक मुद्देभोजापूर खोरे। महिलांची पाण्यासाठी वणवण; दुरूस्तीचे काम युध्दपातळीवर

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील भोजापूर खोरे परिसरात बुधवारी झालेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या जोरदार तडाख्यामुळे धरण परिसरात मोठ्या प्रमाणावर वीज तारा तुटल्याने व विजेचे खांब कोसळल्याने कणकोरीसह पाचगाव नळपाणी पुरवठा योजना चार दिवसांपासून ठप्प झाली आहे.
त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. वीज पुरवठा तात्काळ सुरू करून पाणीपुरवठा योजना सुरू करावी अशी मागणी ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामस्थांनी केली आहे. निसर्ग चक्री वादळाची तीव्रता लक्षात घेऊन वीज वितरण कंपनीकडून सुमारे २० तासाहून अधिक काळ वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. या वादळामुळे परिसरासह भोजापूर धरण परिसरातील वीजवाहक तारा तसेच खांब कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे कणकोरीसह पाच गाव पाणीपुरवठा योजना ठप्प झाली आहे. या योजनेवर आधारित असलेल्या पाच गावात दिवसा आड पाणी पुरवठा केला जात आहे. नांदुरशिंगोटे गाव परिसरात पिण्याच्या पाण्याचे इतर जलस्त्रोत नसल्याने नागरिकांना व महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. परिसरातील विहिरी व बोअरवेलच्या पाण्याने तळ गाठला असल्याने पिण्यायोग्य पाणी मिळणे अवघड होऊन बसले आहे. सध्या कोरोना संसर्गामुळे नागरिक धास्तावले असून कुठलेही पाणी पिण्यास धजावत नाही. त्यामुळे ही योजना तात्काळ सुरळीत करून पाणीपुरवठा सुरू करावा अशी मागणी पाचही गावातील नागरिकांनी केली आहे. निसर्ग चक्र ीवादळाच्या तीव्रतेमुळे भोजापूर धरण परिसरातील वीजवाहक तारा व खांब पडले आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे.
दुरु स्तीचे काम युद्ध पातळीवर सुरु असून लवकरात लवकर वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी कर्मचारी प्रयत्नशील असल्याचे वीज वितरणचे शाखा अभियंता राहुल भगत यांनी सांगितले.
कणकोरीसह पाचगाव नळपाणी पुरवठा योजनेचा वीजपुरवठा लवकरात लवकर सुरु ळीत करण्याची मागणी नांदूरशिंगोटे ग्रामपंचायतीचे सरपंच गोपाल शेळके यांनी केली आहे. नांदूरशिंगोटे गावाचा समावेश कणकोरी पाणी पुरवठा योजनेत आहेत. तांत्रिक बिघाड झाल्याने गेल्या चार दिवसापासून गावातील पाणी पुरवठा बंद आहेत. ग्रामस्थांनी पाण्याची बचत करु न महिलांनी पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन सरपंच शेळके यांनी केले आहे. निसर्ग वादळाने भोजापूर धरण परिसरात मोठ्या प्रमाणात विद्युत पोलचे नुकसान केले आहेत. त्यामुळे या भागातील वीजपुरवठा सुरु ळीत होण्यासाठी दोन ते तीन दिवसाचा कालावधी लागणार असल्याने नागरिकांनी सहकार्य करावे असेही आवाहनही सरपंच शेळके यांनी केले आहे.

Web Title: Five villages have no water supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.