महापालिकेच्या मोहिमेत सातपूरला पाच गाळे जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 12:51 AM2019-03-23T00:51:57+5:302019-03-23T00:52:28+5:30
थकबाकी वसुलीसाठी मनपाच्या सातपूर विभागीय कार्यालयाने धडक मोहीम हाती घेतली असून, गाळे गाळेधारकांकडून एक लाख ४७ हजार रु पयांची एका दिवसात वसुली केली आहे, तर पाच गाळे सील करण्याची कारवाई करण्यात आली आहे.
सातपूर : थकबाकी वसुलीसाठी मनपाच्या सातपूर विभागीय कार्यालयाने धडक मोहीम हाती घेतली असून, गाळे गाळेधारकांकडून एक लाख ४७ हजार रु पयांची एका दिवसात वसुली केली आहे, तर पाच गाळे सील करण्याची कारवाई करण्यात आली आहे.
विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्र वारी सातपूर गावातील श्री छत्रपती शिवाजी महाराज मंडईत धडक वसुली मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत थकबाकीदार गाळेधारकांकडून एक लाख ४७ हजार रु पयांची वसुली करण्यात आली आहे, तर याच मंडईतील पाच गाळे सील करण्याची कारवाई करण्यात आली.
यापुढेही अशीच धडक मोहीम सुरू राहणार असून, जप्ती मोहीम टाळण्यासाठी थकबाकीदारांनी आपली थकबाकी वेळीच भरावी, असे आवाहन विभागीय अधिकारी गायकवाड यांनी केले आहे. विविध करांसह घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीसाठी, जप्तीमोहीम राबविण्यासाठी सहायक अधीक्षक भास्कर थेटे, बबन घाटोळ यांच्यासमवेत रामचंद्र सूर्यवंशी, विष्णू पगार, दादा बंदावणे, पोपट बंदावणे, मनोहर बेंडकुळे, संजय निगळ, प्रभाकर बंदावने आदींसह कर्मचाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले असून, हे पथक वसुली आणि जप्तीसाठी मोहीम राबविणार असल्याचे विभागीय अधिकाऱ्यांनी सांगितले.