रुग्णालय तोडफोडप्रकरणी पाच वर्षे कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 11:52 PM2019-05-10T23:52:48+5:302019-05-11T00:05:21+5:30
रुग्णाच्या प्रकृतीबाबत तसेच डॉक्टरांकडून केलेल्या उपचाराविषयी शंका घेत रुग्णालयात तोडफोड करून धिंगाणा घालत डॉक्टरचे अपहरण केल्याची घटना २०११ मध्ये वोक्हार्ट रुग्णालयाच्या परिसरात घडली होती. या प्रकरणी जिल्हा न्यायालयात खटला सुरू होता.
नाशिक : रुग्णाच्या प्रकृतीबाबत तसेच डॉक्टरांकडून केलेल्या उपचाराविषयी शंका घेत रुग्णालयात तोडफोड करून धिंगाणा घालत डॉक्टरचे अपहरण केल्याची घटना २०११ मध्ये वोक्हार्ट रुग्णालयाच्या परिसरात घडली होती. या प्रकरणी जिल्हा न्यायालयात खटला सुरू होता. जिल्हा व सत्र न्यायाधीश सुचित्रा घोडके यांनी, पित्यासह त्याची दोन मुले अशा पाच आरोपींना पाच वर्ष कारवासाची शिक्षा सुनावली आहे.
२०११ मध्ये वोक्हार्ट रुग्णालयात पुष्पा टिळे यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. पुष्पा यांची तब्येत ढासळल्याने डॉ. सोनवणे यांनी कुटुंबीयांना चर्चेसाठी बोलवले; मात्र बबनराव सहादू टिळे, रवींद्र बबनराव टिळे, अमित सुरेश खांदवे, वसंत नाना काळे, सागर बबनराव टिळे (सर्व रा. मखमलाबाद नाका) यांनी रुग्णाचे बरेवाईट झाले, असे गृहीत धरून रुग्णालयात तोडफोड करून धिंगाणा घातला. तसेच कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व मारहाण केली होती. त्यानंतर सोनवणे यांचे अपहरण करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचेही समोर आले होते.
याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात पाच संशयितांविरुद्ध जिवे ठार मारण्याचा प्रयत्न, अपहरण तसेच महाराष्टÑ वैद्यकीय सेवा व्यक्ती आणि वैद्यकीय संस्था कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
फिर्यादी फि तूर
या खटल्याची सुनावणी सुरू असताना भद्रकाली पोलीस ठाण्यात फिर्याद देणारा फिर्यादी न्यायालयात फि तूर झाला; मात्र परिस्थितीजन्य पुरावे न्यायालयासमोर आल्याने न्यायालयाने त्याआधारे संशयितांना दोषी धरत पाचही आरोपींना कारावास दिला.