पाच वर्षांत १,१४७ नाशिककरांनी रस्त्यांवर सोडले प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:15 AM2021-01-20T04:15:52+5:302021-01-20T04:15:52+5:30

----- अझहर शेख, नाशिक : दरवर्षी जानेवारीचा पंधरवडा उलटला की ‘रस्ता सुरक्षा अभियान’ राबिवले जाते. यामागील उद्देश हाच असतो ...

In five years, 1,147 Nashik residents lost their lives on the roads | पाच वर्षांत १,१४७ नाशिककरांनी रस्त्यांवर सोडले प्राण

पाच वर्षांत १,१४७ नाशिककरांनी रस्त्यांवर सोडले प्राण

Next

-----

अझहर शेख, नाशिक : दरवर्षी जानेवारीचा पंधरवडा उलटला की ‘रस्ता सुरक्षा अभियान’ राबिवले जाते. यामागील उद्देश हाच असतो की लोकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जनजागृती व्हावी, जेणेकरुन अपघातांना ‘ब्रेक’ लागावा; मात्र मागील पाच वर्षांमध्ये केवळ शहरातील रस्त्यांवर सुमारे १ हजार १४७ नाशिककरांनी तब्बल ४ हजार ५१८ अपघातांमध्ये आपले प्राण गमावले.

‘आवरा वेगाला, सावरा जीवाला’, ‘वेग कमी, जीवनाची हमी’ ‘वाहतुकीचे नियम पाळा, अपघात टाळा’ असे विविध प्रकारची घोषवाक्य नागरिकांच्या नेहमी कानावर पडतात आणि वाचण्यातही येतात; मात्र हे घोषवाक्य केवळ फलकांपुरतेच मर्यादित आहे, किंबहुना असे फलक उभारून औपचारिकता पूर्ण केली गेली, या अविर्भावात राहून नागरिक आपली वाहने सुसाट रस्त्यांवरून चालवितात आणि अपघाताला कारणीभूत ठरतात. वर्षाच्या पहिल्या महिन्यात ‘रस्ता सुरक्षा सप्ताह’ साजरा होत असला तरी प्रत्येक वर्षी अपघाताचे प्रमाण कमी होताना शहरात दिसत नाही. नाशिककरांकडून सर्रासपणे वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली केली जाते. परिणामी अपघातांना निमंत्रण मिळते.

शहरात होणाऱ्या अपघातांना केवळ वाहतूक नियमांची पायमल्ली कारणीभूत आहे, असे नाही तर रस्त्यांभोवती असलेले अतिक्रमण, रस्त्यांवरील खड्डे, वाहतूक नियमांबाबत जागरूक करणाऱ्या विविध सांकेतिक व चिन्हांकित सूचना फलकांचा अभाव, भटक्या श्वानांची वाढती संख्या, भुयारी गटारींच्या चेंबरवरील नादुरुस्त ढापे हीदेखील कारणे आहेत. महापालिका प्रशासनानेसुध्दा या रस्ता सुरक्षा अभियानामध्ये किमान आपल्या विभागाशी संबंधित समस्या जरी निकाली काढण्यावर भर दिला तरी कुंभनगरी अपघातमुक्त होण्यास हातभार लागेल, असा आशावाद व्यक्त होत आहे.

----इन्फो---

१ हजार ४४४ नागरिक जखमी

नाशिक शहरात मागील तीन वर्षांमध्ये झालेल्या अपघातांत सुमारे १ हजार ४४४ प्रवासी जखमी झाल्याची नोंद आरटीओकडे आहे. शहरात २०१८ साली ५८१ अपघातांमध्ये ५५७ व्यक्ती जखमी झाले होते. तसेच २०१९मध्ये ५५३ अपघातांची नोंद होऊन ५४० लोक जखमी झालेत आणि गेल्या वर्षी नोव्हेंबरअखेरपर्यंत ३७२ अपघात घडले, यामध्ये ३४७ प्रवासी जखमी झाले.

---इन्फो---

वर्षनिहाय अपघात अन‌् मृत्यूची संख्या अशी....

वर्ष- अपघात - मृत्युमुखी

२०१५- १३२० - २३४

२०१६- १०३१ - २१३

२०१७- ६६१ - १७१

२०१८- ५८१ - २१८

२०१९- ५५३ - १७७

२०२०- ३७२ - १३४

-----

फोटो आर वर१९ॲक्सिडेंट/ आणि १९ॲक्सिडेंट१ नावाने सेव्ह आहे.

Web Title: In five years, 1,147 Nashik residents lost their lives on the roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.