पेठ तालुक्यातील समस्या सोडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 03:34 PM2019-06-19T15:34:19+5:302019-06-19T15:34:33+5:30
समितीला निवेदन : आदिवासी संघटनांचे निवेदन
पेठ : तालुक्यातील शिक्षण,आरोग्यासह शासकिय सवलतींचा लाभ घेण्यासाठी सामान्य नागरिकांना सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत असून आदिवासी जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी शासनाने लक्ष घालावे,अशी मागणी आखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने निवेदनाद्वारे केली आहे.
राज्य शासनाची आदिवासी क्षेत्र विकास समिती पेठ तालुका दौऱ्यावर आली असता विविध आदिवासी संघटनांनी विवेक पंडित यांची भेट घेऊन समस्या मांडल्या. पेठ रूग्णालयातील रिक्त पदे तात्काळ भरावीत, जीर्ण व नादुरु स्त झालेल्या रु ग्णवाहिका बदलून मिळाव्यात, पेठ शाळेला नवीन इमारत बांधकाम करण्यात यावे, आदिवासी खेळाडूंना आर्थिक मदत मिळावी, आश्रमशाळा शिक्षकांची रिक्त पदे भरावीत, निकृष्ट कामांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, शासकिय वस्तीगृहातील जागा वाढवून द्याव्यात, आदिवासी युवकांना त्यांच्या शैक्षणकि पात्रतेनुसार रोजगार उपलब्ध करून द्यावा, आदी मागण्यांचे निवेदन समतिीचे प्रमुख विवेक पंडीत यांना देण्यात आले. यावेळी राज्य युवा कार्याध्यक्ष गणेश गवळी, तालुकाध्यक्ष शरद पवार, हिरामण शेवरे, कुमार पवार आदी उपस्थित होते.