कांदा अनुदान मागणी अर्जाकरीता मुदत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 06:01 PM2019-01-21T18:01:16+5:302019-01-21T18:01:31+5:30
चांदवड : महाराष्ट्र शासनाने शेतकरी बांधवांकडून कांदा अनुदान मागणी अर्ज मागविण्यात आलेले होते.त्याला शासनाकडूनच मुदत वाढ करण्यात आल्याने २५ जानेवारी पर्यंत कांदा अनुदानाकरीता अर्ज करण्याची विनंती चांदवड बाजार समितीने केले आहे.

दि. ०१ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०१८ या कालावधीतील चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारांवर कांदा या शेतीमालाची विक्री केलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल रुपये २०० व जास्तीत जास्त २०० क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान देण्याचा महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतलेला आहे.
त्यानुसार शेतकरी बांधवांकडून कांदा अनुदान मागणी अर्ज मागविण्यात आलेले होते. मात्र कांदा अनुदान मागणी अर्ज जमा करण्यासाठी मुदतवाढ मिळण्याची मागणी शेतकरी बांधवांनी केलेली होती.
त्यानुसार पणन संचालक महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडील पत्रानुसार चांदवड बाजार समितीत कांदा विक्री केलेल्या शेतकºयांना अर्ज करण्यासाठी दि. २५ जानेवारी २०१९ पर्यंतची मुदतवाढ दिलेली आहे.