ध्वजनिधी संकलन ही देशसेवाच : भुवनेश्वरी एस.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 12:11 AM2019-12-19T00:11:48+5:302019-12-19T00:12:07+5:30
देशासाठी लढणाऱ्या सैनिकांविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ध्वजनिधी संकलनाची संकल्पना आहे. सैनिक सीमेवर आपले कर्तव्य बजावत असताना आपणही आपली सामाजिक जबाबदारी म्हणून ध्वजनिधी संकलनासाठी पुढे आले पाहिजे, ही केवळ एक सामाजिक जाणीवच नाही तर देशसेवेची संधीदेखील असल्याचे प्रतिपादन प्रभारी जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी केले.
नाशिक : देशासाठी लढणाऱ्या सैनिकांविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ध्वजनिधी संकलनाची संकल्पना आहे. सैनिक सीमेवर आपले कर्तव्य बजावत असताना आपणही आपली सामाजिक जबाबदारी म्हणून ध्वजनिधी संकलनासाठी पुढे आले पाहिजे, ही केवळ एक सामाजिक जाणीवच नाही तर देशसेवेची संधीदेखील असल्याचे प्रतिपादन प्रभारी जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील सभागृहात ध्वजनिधी संकलन कार्याचा शुभारंभ करण्यात आला यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, अपरजिल्हाधिकारी नीलेश सागर, सहायक उपजिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, निवासी अपरजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे उपस्थित होते.
यावेळी भुवनेश्वरी म्हणाल्या, देशाच्या सीमेवर लढणारे सैनिक कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज असतात. आपल्या कुटुंबापासून दूर राहात देशाचे संरक्षण करण्यासाठी अगे्रसर असतात. त्यांच्या कुटुंबीयांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करणे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. त्यासाठीच ध्वजनिधी संकल्पना आहे. यासाठी प्रत्येक नागरिकाने आपले योगदान देणे अपेक्षित आहे. अधिकाऱ्यांनी माजी सैनिकांच्या समस्या सोडविण्याबाबत संवेदनशीलतेने काम करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील व मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांनी केले. सिन्नर येथील गोपीनाथ कुटे या सेवानिवृत्त माजी सैनिकाचे पुनर्वसन होण्यासाठी कल्याणकारी विधीमधून स्वयंरोजगारांतर्गत ट्रॅक्टरची चावी व २ लाख ८४ हजार ९६७ रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी माजी सैनिकांच्या गुणवंत पाल्यांचा दहा हजार रुपये आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. ध्वजनिधी संकलनात चांगली कामगिरी करणाºया कार्यालयांचादेखील सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी महाराष्टÑ गौरव पुरस्कार योजनेंतर्गत १५ मराठा लाईट इन्फंट्रीमधील शिपाई शिवाजी भुसारे यांनी जम्मू-काश्मीरच्या पुंच्छ जिल्ह्याच्या सीमारेषेवर १८ फेब्रुवारी २०१८ रोजी ड्यूटीवर असताना आतंकवाद्यांविरुद्ध केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल सेना पदक बहाल केल्याने शासनाकडून १२ लाख रुपयांचा धनादेश मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.