गडकिल्यांवर ध्वजारोहण करण्याचा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2021 06:33 PM2021-01-27T18:33:42+5:302021-01-27T18:36:51+5:30
घोटी : इगतपुरी तालुक्यातील गिर्यारोहक तथा कळसुबाई मित्र मंडळाचे पदाधिकारी यांना आपल्या उपक्रमाची परंपरा कायम ठेवत चौल्हेर या ऐतिहासिक किल्ल्यावर जाऊन तेथे प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करण्यात आले. तिरंगा झेंडा फडकावत या गिर्यारोहकांनी या किल्ल्याच्या इतिहासाला उजाळा दिला.

हा दुर्लक्षित किल्ला गिर्यारोहकांना व सामान्यजनतेला माहिती व्हावा तसेच शासनाच्या पुरातत्व विभागाचे लक्ष वेधण्याच्या उद्देशाने घोटीच्या प्रसिद्ध कळसुबाई मित्र मंडळाच्या गिर्यारोहकांनी प्रजासत्ताक दिनी किल्ल्यावर चढाई करून तिरंग्याचे ध्वजारोहण केले व राष्ट्रगीत गाऊन जय हिंद, भारत माता की जय, जय जिजाऊ, जय शिवराय अशा घोषणा देत लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
ह्या उपक्रमात मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगीरथ मराडे, बाळू आरोटे, मच्छिंद्र कोरडे, अशोक हेमके, प्रवीण भटाटे, निलेश पवार, बाळासाहेब वाजे, विनोद भागडे, संदीप खैरनार, काळू भोर, सुरेश चव्हाण, लक्ष्मण जोशी, गोकुळ चव्हाण, उमेश दिवाकर, जैनम गांधी, मयूर मराडे, भगवान तोकडे, लकी राका, मनोहर आडोळे, दर्शन म्हसने, गजानन चव्हाण आदी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.