पिंपळगाव डुकरा येथे सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:18 AM2021-08-19T04:18:09+5:302021-08-19T04:18:09+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन न करता व प्रभातफेरी न काढता अतिशय साधेपणाने स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन न करता व प्रभातफेरी न काढता अतिशय साधेपणाने स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्वातंत्र्योत्तर काळातील आठवणींना उजाळा देत आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर माजी सरपंच कचरू पाटील डुकरे यांनी कोरोनाकाळात शिक्षण आणि आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडून गेली असताना सध्या या दोन गोष्टीकडे अधिक लक्ष देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक चंद्रकांत गांगुर्डे यांनी केले.
याप्रसंगी सरपंच मालन भगवान वाकचौरे, ग्रामविकास अधिकारी नितेश हेंबाडे, उपसरपंच रामभाऊ भगत, माजी सरपंच कचरू पाटील डुकरे, भगवान वाकचौरे, राम जाधव, ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी, विकास कार्यकारी संस्थेचे सर्व पदाधिकारी, शिक्षकवृंद व ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो- १८ पिंपळगाव डुकरा
पिंपळगाव डुकरा येथे भारतीय सैन्यदलातील जवान शंकर झनकर यांच्या हस्ते ध्वजारोहण प्रसंगी सरपंच मालन वाकचौरे, माजी सरपंच कचरू पाटील डुकरे.
180821\18nsk_17_18082021_13.jpg
फोटो- १८ पिंपळगाव डुकरा