टाकळी ग्रामपंचायतीवर महाविकासचा झेंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:13 AM2021-02-15T04:13:46+5:302021-02-15T04:13:46+5:30
मालेगाव : टाकळी ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीची सत्ता आली असून, सरपंच पदासाठी महेंद्र सोनवणे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची ...
मालेगाव : टाकळी ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीची सत्ता आली असून, सरपंच पदासाठी महेंद्र सोनवणे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची या पदावर बिनविरोध निवड करण्यात आली. तर उपसरपंचपदी अनिल वाघ यांची निवड केली आहे.
शुक्रवारी गणपूर्तीअभावी येथील सभा तहकूब झाली होती. शनिवारी (दि. १३) निवडणूक निर्णय अधिकारी बी. एस. गावीत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. महाविकास आघाडीच्या पॅनलचे नेतृत्व माजी जिल्हा परिषद सदस्य शरद माळी, माजी सरपंच संतोष निकम, माजी उपसरपंच समाधान शेवाळे, कैलास शेवाळे, भूषण दाते, संजय शेवाळे, कुणाल बडजाते यांनी केले. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या निवडीचे पालकमंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे, मविप्रचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, माजी आमदार पंकज भुजबळ आदींनी स्वागत केले आहे.
नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार केल्यानंतर समर्थकांनी एकच जल्लोष केला. यावेळी विकास वाघ, अशोक गांगुर्डे, रामदास माळी, रामदास शेवाळे, शांताराम साळे, नीलेश वाघ, समाधान अहिरराव, राहुल पाटील, मुन्ना शेवाळे, अरुण शेवाळे, स्वप्नील निकम, किरण बोरसे आदी उपस्थित होते. निवडणूक अधिकारी गावीत यांना ग्रामसेवक बी. आर. बोरसे यांनी सहकार्य केले. नूतल पदाधिकाऱ्यांचा कृषिमंत्री भुसे व मविप्रचे अध्यक्ष डॉ. शेवाळे यांच्या कार्यालयात सत्कार करण्यात आला.
कोट...
ग्रामविकासाचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू. सर्व समाज घटक व सदस्यांना विश्वासात घेऊन काम करण्यात येईल. राज्य शासनाच्या सर्व योजना प्रभावीपणे राबवितानाच ज्येष्ठ नेत्यांच्या सहकार्याने विकासकामांसाठी जास्तीत जास्त निधी आणण्याचा प्रयत्न करू.
- महेंद्र सोनवणे, सरपंच, टाकळी
===Photopath===
140221\14nsk_14_14022021_13.jpg
===Caption===
मालेगाव तालुक्यातील टाकळी ग्रामपंचायत सरपंचपदी महाविकास आघाडीचे महेंद्र सोनवणे यांची निवड झाल्यानंतर आनंद व्यक्त करताना शरद माळी, संतोष निकम, समाधान शेवाळे, कैलास शेवाळे आदि.