वटार येथे झापास आग; संसारोपयोगी वस्तू खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 12:47 AM2018-04-07T00:47:02+5:302018-04-07T00:47:02+5:30
वटार : येथे सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास झापास अचानक आग लागून अंदाजे 30 ते 40 हजारच्या रु पयाच्या संसार उपयोगी वस्तू जळून खाक झाल्या.
वटार : येथे सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास झापास अचानक आग लागून अंदाजे 30 ते 40 हजारच्या रु पयाच्या संसार उपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. येथील शेतमजूर छोटू शामा पवार हे सर्व शेत मजुरीसाठी गेल्याने घराला आग लागण्याचे नेमके कारण समजू शकले नाही. आजूबाजूच्या शेतकर्यांनी प्रयत्न करून आग विझवण्याचा प्रयत्न केला पण आग इतकी भयानक होती की सर्व साहित्य जळून खाक झाले. ‘‘ह्या आदिवासी कुटुंबाची आज निवार्याची सोय आगीत भस्मसात झाली असून थोडेफार मजुरी करून साठवलेले पैसे देखील ह्या आगीत जळाल्याने आज हे आदिवासी कुटुंब उन्हात पडले आहे. छोटू शामा पवार यांचाच मुलगा एक मिहन्यापूर्वी बंधार्यात बुडून मेला होता हि घटना तूर्त हे कुटुंब विसरले नाही तेवड्यात हि दुसरी घटना घडल्याने ह्या आदिवासी मोठा आघात झाला आहे.’’ सदर घटनेची माहिती कळताच घटनास्थळी धाव घेत पोलिसपाटील किरण खैरनार यांनी प्रत्यक्ष घटनेची पाहणी केली व तलाटी यांना फोन करून सविस्तर माहिती दिली. यावेळी उपसरपंच जितेंद्र शिंदे, जिभाऊ खैरनार संतोष खैरनार, किसन शिंदे, ताराचंद खैरनार, योगेश बागुल, रामदास जाधव, परिसरातील शेतकरी उपस्थित होते.