भाजीपाल्यावर हिमकणांची चादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 12:56 AM2018-12-30T00:56:42+5:302018-12-30T00:57:11+5:30
परिसरात शनिवारी (दि. २९) तापमानाचा पारा २ अंशांवर आल्याने परिसरातील शेतमालावर हिमकणांची चादर पसरली आहे. गेल्या चार दिवसांपासून पहाटे कडाक्याची थंडी पडत असल्याने कादवा-बाणगंगा-गोदावरी खोऱ्यातील कुंदेवाडी, रौळस पिंपरी, सुकेणे, ओणे, थेरगाव, कोकणगाव, साकोरे मिग ही गावे गारठली आहेत.
कसबे सुकेणे : परिसरात शनिवारी (दि. २९) तापमानाचा पारा २ अंशांवर आल्याने परिसरातील शेतमालावर हिमकणांची चादर पसरली आहे. गेल्या चार दिवसांपासून पहाटे कडाक्याची थंडी पडत असल्याने कादवा-बाणगंगा-गोदावरी खोऱ्यातील कुंदेवाडी, रौळस पिंपरी, सुकेणे, ओणे, थेरगाव, कोकणगाव, साकोरे मिग ही गावे गारठली आहेत. कसबे सुकेणे येथील ओझर रस्त्यावरील शेवकर,भंडारे वस्ती तसेच रामदास पूरकर, गोविंद जाधव यांच्या शेतातील पुदिन्यावर हिमकणांची झालर पसरली होती. दिवसभर थंडीचा कडाका कायम होता.
बुधवारपासून पाटोदा परिसरात थंडीची लाट कायम आहे. थंडीने परिसर पूर्णपणे गारठला आहे. रात्रभर थंडीच्या कडक्याने कहर केला आहे. रात्रीबरोबरच दिवसाही थंडीने हुडहुडी भरत आहे. कडाक्याच्या थंडीमुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून परिसरात तापमान सहा ते आठ अंश सेल्सिअस नोंदवले जात आहे. सध्या द्राक्षमध्ये साखर निर्माण होत असून, या गोठवणाºया थंडीमुळे द्राक्षमण्यांना तडे जात असल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला जातो की काय या चिंतेने शेतकरी धास्तावला आहे. हाडे गोठवणाºया थंडीमुळे परिसरात सकाळ-संध्याकाळ अघोषित संचारबंदीसारखे वातावरण निर्माण झाले आहे.