फिटे अंधाराचे जाळे... झाले मोकळे आकाश !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 12:45 AM2018-10-28T00:45:57+5:302018-10-28T00:46:41+5:30

कॉँग्रेस, शिवसेना, राष्टवादी व भाजपा असा चौफेर राजकीय प्रवास करीत असताना आणि त्यातून अनेक मित्र जोपासतांनाच राजकीय वैमनस्यही ओढवून घेणाऱ्या हिरे कुटुंबीयांना पुन्हा एकदा नवीन पक्ष प्रवेशाचे वेध लागले आहेत. त्यांची राजकीय घुसमट ओळखून रोज बहुविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्या ‘सदिच्छा’ भेटी घेणे चालविले असून, याद्वारे एकमेकांचे राजकीय वजन वाढवून घेण्याचा प्रयत्न होत आहे.

 Fleet of darkness ... the sky is empty! | फिटे अंधाराचे जाळे... झाले मोकळे आकाश !

फिटे अंधाराचे जाळे... झाले मोकळे आकाश !

googlenewsNext

नाशिक : कॉँग्रेस, शिवसेना, राष्टवादी व भाजपा असा चौफेर राजकीय प्रवास करीत असताना आणि त्यातून अनेक मित्र जोपासतांनाच राजकीय वैमनस्यही ओढवून घेणाऱ्या हिरे कुटुंबीयांना पुन्हा एकदा नवीन पक्ष प्रवेशाचे वेध लागले आहेत. त्यांची राजकीय घुसमट ओळखून रोज बहुविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्या ‘सदिच्छा’ भेटी घेणे चालविले असून, याद्वारे एकमेकांचे राजकीय वजन वाढवून घेण्याचा प्रयत्न होत आहे. याच क्रमात शुक्रवारी सांयकाळी हिरे कुटुंबीयांच्या उंबºयात भुजबळ कुटुंबीयांच्या सदस्याने स्वत:हून हजेरी लावल्याने त्याची राजकीय चर्चा घडली नसती तर ते नवलच ठरले असते. एकेकाळी एकमेकांना राजकीय आखाड्यात पाहून घेण्यासाठी शड्डू ठोकून बाह्या सरसावणाºयांना ‘झाले गेले गंगेला मिळाले’असे म्हणण्याची वेळ का यावी याचीही त्यानिमित्ताने चर्चा होणे साहजिकच आहे.  जिल्ह्यातील राजकारण सध्या वेगळ्या वळणावर पोहोचले आहे. सत्ताधाºयांची ताकद गेल्या चार वर्षांत जितकी वाढली तितकीच नाराजीही कायम आहे. आजचे विरोधक ज्यावेळी सत्ताधारी होते, त्यावेळी यापेक्षा वेगळी परिस्थिती नसली तरी, त्याचा गवगवा मात्र खूप झाला होता. जिल्ह्यातील कोणत्याही राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व ओघानेच आलेल्या गुन्हेगारी घटनेलादेखील भुजबळ हेच जबाबदार असल्याचे चित्र रंगविण्यात भुजबळांचे विरोधक त्याकाळी जसे पुढे होते, तसेच स्वपक्षीयदेखील त्याचे भांडवल करण्यात अग्रभागी होते. त्याचाच फटका २०१४ च्या लोकसभेत बसला व खुद्द छगन भुजबळ यांनाच राजकीय विजनवास पत्करावा लागला.
भुजबळांचे जिल्ह्यातील जे जे विरोधक म्हणून गणले गेले त्यात हिरे कुटुंबीयदेखील मागे नव्हते. अशातच भुजबळ यांची सद्दी संपविण्यासाठी प्रशांत हिरे यांच्या धाकल्या पुत्राने थेट समोरा समोर येऊन दोन हात करण्याचे आव्हान देऊन राजकीय वर्तुळात टाळ्या मिळविल्या होत्या. त्यामुळे भुजबळ व हिरे यांच्यातील वाद जिल्ह्यातील राजकारणात जाहीरपणे उफाळून आला होता. आता चार, साडेचार वर्षांत भुजबळांना त्यांची संपलेली सद्दी जशी परत मिळविण्याची गरज निर्माण झाली, तशीच ती हिरे कुटुंबीयांचीदेखील निकड बनली आहे.
कॉँग्रेसचा वारसा सांगणाºया या कुटुंबीयांनी सत्तेच्या काळात सेनेचे धनुष्य पेलले, त्यानंतर सत्तांतरात राष्टÑवादीचे घड्याळ हातात बांधले, भाजपाचा सर्वत्र बोलबाला झाल्यानंतर ते कमळाच्या पाठीमागे धावले परंतु आता मात्र त्यांची दमछाक होत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी त्यांना ‘जुनं ते सोनं’ असे वाटू लागल्याने त्यांनी वरच्यावर अजित पवार, जयंत पाटील, शरद पवार यांच्या भेटी घेऊन राष्टÑवादी प्रवेशासाठी अधिरता दाखविल्याचेही दिसून आले.
परंतु भुजबळ यांच्या तुरुंगातील सुटकेमुळे तो प्रवेश रोखला गेल्याची चर्चा होत आहे. आॅगस्टमध्ये होणाºया त्यांच्या प्रवेश सोहळ्यासाठी पक्षश्रेष्ठी राजी होत नसल्याने अस्वस्थ झालेल्या हिरे यांच्यासाठी नाशिकच्या दौºयावर येणाºया सर्वपक्षियांनी त्र्यंबकरोडवरील ‘मधुर मुरली’ भोवती रुंजी घालताना दिसून आले. हे करताना त्यातील राजकीय हेतू लपून राहिला नाही. ज्या राष्टÑवादीसाठी आतूर झालो, त्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने अन्य राजकीय पर्याय खुले असल्याचे चित्र हिरेंनी निर्माण करण्यात यश मिळविले. नेमकी त्यांची हीच खेळी लोकसभेसाठी पुन्हा इच्छुक असलेल्या भुजबळ कुटुंबीयांना धोक्याची वाटली असावी, त्यामुळेच की काय एरव्ही भुजबळांसमोर हिरेंचे व हिरेंसमोर भुजबळ यांचे नाव घेण्यावर कडक निर्बंध असतानाही समीर भुजबळ यांनी काही दिवसांपूर्वी वाढदिवस साजरा करून विसरही पडलेल्या प्रशांत हिरे यांना शुभेच्छा देण्यासाठी शुक्रवारच्या तिन्ही सांजेची वेळ निवडली. हाती भला मोठा पुष्पगुच्छ देऊन हिरे कुटुंबीयांच्या पुढील वाटचालीस त्यांनी जशा शुभेच्छा दिल्या, तशाच त्या हिरेंकडून भुजबळ कुटुंबीयांच्याही पदरात पाडून घेतल्या.
दोन्ही कुटुंबीयांनी दीड दशकातील राजकीय वैमनस्य विसरून एकमेकांची सुख-दु:खे जाणून घेताना आपापली राजकीय सोयदेखील यानिमित्ताने पाहून घेत, त्यातील अडचणींवर चर्चा केली. आता या राजकीय भेटीची चर्चा जो तो आपापल्यापरीने करण्यास मोकळा असला तरी, हिरे-भुजबळ यांनीही स्वत:ची सोय या भेटीच्या निमित्ताने करून घेतली आहे. या भेटीसाठी नेमका कोणाचा पुढाकार होता हे मात्र गुलदस्त्यात आहे.

Web Title:  Fleet of darkness ... the sky is empty!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.