पाणीचोरांना हिसका ; शहरात अनधिकृत नळजोडणीची शोधमोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 01:24 AM2018-02-24T01:24:08+5:302018-02-24T01:24:08+5:30

महापालिकेने शहरात अनधिकृत नळजोडणीची शोधमोहीम सुरू केली असून, त्यात पाणीचोरी करणाºया ३५ अनधिकृत नळजोडणीधारकांविरुद्ध पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदर मोहीम आणखी तीव्र केली जाणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे.

Flickers; The search for unauthorized nudity in the city | पाणीचोरांना हिसका ; शहरात अनधिकृत नळजोडणीची शोधमोहीम

पाणीचोरांना हिसका ; शहरात अनधिकृत नळजोडणीची शोधमोहीम

Next

नाशिक : महापालिकेने शहरात अनधिकृत नळजोडणीची शोधमोहीम सुरू केली असून, त्यात पाणीचोरी करणाºया ३५ अनधिकृत नळजोडणीधारकांविरुद्ध पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदर मोहीम आणखी तीव्र केली जाणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे.  शहरातील अनधिकृत नळकनेक्शन अधिकृत करून घेण्यासाठी महापालिकेने ४५ दिवसांची अभय योजना राबविली होती. परंतु, या योजनेला सुमारे २५०० नळजोडणीधारकांनीच प्रतिसाद दिला. त्यामुळे महापालिकेने सहाही विभागांमध्ये अनधिकृत नळकनेक्शन शोध मोहीम बुधवार (दि.२१) पासून हाती घेतली. त्यानुसार, गुरुवारी (दि.२२) राबविलेल्या मोहिमेत पाणीचोरी करणारे तब्बल ३५ नळजोडणीधारक आढळून आले. महापालिकेने या पाणीचोरांविरुद्ध पोलिसांत गुन्हे दाखल करत दणका दिला आहे. सदर मोहिमेअंतर्गत नाशिक पश्चिम विभागात सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये उपअभियंत्यांनी तक्रार दाखल केल्याने चंद्रकांत जगन्नाथ आगले, संतोष रवींद्र चांदवडकर, चंद्रभागा नारायण कस्तुरे, विशाल देवराम चांदवडकर, मनोज लक्ष्मण काकडे, संजय मोरे, भगवान गांगुर्डे, गणेश राजाराम मुर्तडक, लालाशेट निमाणी, सुधाकर रामभाऊ वाघमारे, सतीश पाटील, मदन गांगुर्डे, मनोज चांदगुडे, गणेश मुर्तडक, प्रकाश दाधीच, कैलास गंगाधार वाघमारे, कुलकर्णी, प्रकाश चोकसी, सुधीर शिंपी, मोफतलाल मेहता या अनधिकृत नळजोडणीधारकांवर गुन्हा दाखल केलेला आहे . तसेच पंचवटी विभागात नीलेश तुपे, मुरलीधर मंडलिक, रोकडे, योगीता साडी सेंटरचे मालक, तर सिडको विभागात इंदिरानगर पोलीस स्टेशनमध्ये माउली प्राइड अपार्टमेंटचे चेअरमन, तसेच संजीव सुखदेव रोकडे, मदन ढेमसे, सातपूर विभागात प्लंबर गौतम श्रीरंग गांगुर्डे, काळे यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने एका प्रसिद्धीपत्रकान्वये कळविली आहे. नाशिकरोड विभागातही आठ नळजोडणीधारकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हॉटेल्सही रडारवर
शहरात मोठ्या संख्येने हॉटेल्स, रेस्टॉरंट आहेत. यापूर्वी शहरातील एका बड्या हॉटेल्सने केलेली पाणीचोरी शिवसेनेच्या नगरसेवकाने उघडकीस आणली होती. त्यामुळे, अनधिकृत नळजोडणीमध्ये काही हॉटेल्स, रेस्टॉरंटचाही समावेश असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाला मिळाली असून संबंधित हॉटेल्सही रडारवर असल्याची सूत्रांनी म्हटले आहे. दरम्यान, कुठे पाणीचोरी होत असल्याचे आढळून आल्यास नागरिकांनी त्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला कळवावी. संबंधितांचे नाव गुप्त ठेवले जाणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाने म्हटले आहे.

Web Title: Flickers; The search for unauthorized nudity in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.