भाजीपाला खरेदीसाठी झुंबड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 10:47 PM2020-03-24T22:47:43+5:302020-03-25T00:17:47+5:30
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न केले जात असतानाच मंगळवारी पुन्हा नाशिक बाजार समितीत भाजीपाला खरेदीसाठी ग्राहकांनी सोमवारप्रमाणे गर्दी केली. नागरिकांची झालेली गर्दी बघून बाजार समितीने एकच मुख्य प्रवेशद्वार सुरू ठेवून गर्दी आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केला.
पंचवटी : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न केले जात असतानाच मंगळवारी पुन्हा नाशिक बाजार समितीत भाजीपाला खरेदीसाठी ग्राहकांनी सोमवारप्रमाणे गर्दी केली. नागरिकांची झालेली गर्दी बघून बाजार समितीने एकच मुख्य प्रवेशद्वार सुरू ठेवून गर्दी आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केला.
सोमवारी भाजीपाला खरेदीसाठी उडालेली झुंबड पाहता मंगळवारी प्रारंभी बाजार समितीत केवळ शेतकरी व्यापारी व आडते यांना सोडले जात होते, मात्र त्यानंतर टप्प्याटप्प्याने नागरिकांना भाजीपाला खरेदीसाठी प्रवेश देण्यात आला. त्याचबरोबर पोलिसांनाही पाचारण करण्यात आल्यामुळे बाजार समितीतील गर्दी काहीशी नियंत्रणात आल्याचे दिसून आले.
मंगळवारी भाजीपाला खरेदी केल्यानंतर भाजीविक्रेत्यांनी मुख्य रस्त्यावर ५० ते १०० मीटरच्या अंतरावर रस्त्याच्या कडेला बसून दुकाने थाटली, तर काहींनी चारचाकी वाहने व रिक्षात नागरिकांना भाजीपाला विक्री केला. भाजीपाला खरेदी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी गर्दी करू नये, असे आवाहन बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.