स्मार्ट रोडवरून वादाचा ‘महापूर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:11 AM2021-06-18T04:11:39+5:302021-06-18T04:11:39+5:30

फरांदे यांनी बुधवारी (दि. १६) दहीपूल, कानडे मारोती लेन परिसरात भेट देऊन रस्त्याची कामे तातडीने थांबविण्याची मागणी केली आहे. ...

'Flood' of controversy over smart road | स्मार्ट रोडवरून वादाचा ‘महापूर’

स्मार्ट रोडवरून वादाचा ‘महापूर’

googlenewsNext

फरांदे यांनी बुधवारी (दि. १६) दहीपूल, कानडे मारोती लेन परिसरात भेट देऊन रस्त्याची कामे तातडीने थांबविण्याची मागणी केली आहे. मात्र, गुरुवारी (दि.१७) हे काम सुरूच होते.

स्मार्ट सिटी कंपनीने गावठाण विकास योजनेंतर्गत नाशिक आणि पंचवटी गावठाणात रस्ते, पाणीपुरवठा, मलवाहिका टाकण्याची कामे सुरू केली आहेत. मात्र, ही कामे करतानाच बाजारपेठा आणि विशेषकरून सराफ बाजारात दरवर्षी पावसाचे पाणी साचण्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत. गेल्या वर्षभरापासून ही कामे सुरू आहेत. धुमाळ चौक, सराफ बाजार यासह अन्य भागात मोठ्या प्रमाणात खोदकाम करून रस्ते आणि अन्य कामे केली जात आहेत. मात्र, कोरोना कमी झाल्याने उघडलेल्या बाजारपेठांमध्ये त्यामुळे समस्या निर्माण होत आहेत. कधी केबल तुटल्याने वीजपुरवठा खंडित होताे, तर कधी जलवाहिनी फुटते, अशा प्रकारची कामे सुरू असतानाच आता या कामाच्या विषयी वेगळाच वाद सुरू आहे. आमदार फरांदे यांच्या म्हणण्यानुसार व्यापारी आणि व्यवसायिकांनी कामाच्या तक्रारी केल्याने त्यांनी बुधवारी (दि.१६) दौरा केला. त्यावेळी नागरिकांनी तक्रारी केल्याच; परंतु रस्त्याचा स्तर कमी अधिक झाल्याने पावसाळ्यात पाणी साचून पुराचा धोका कैकपटीने वाढला आहे. शिवाय सखल रस्ते तयार झाल्याने येथील वाड्यांनादेखील धोका निर्माण झाला आहे, अशी तक्रार आमदार फरांदे यांनी केली आहे. यावेळी महापालिकेचे शहर अभियंता संजय घुगे, कार्यकारी अभियंता संजय बच्छाव, स्मार्ट सिटी कंपनीचे व्यवस्थापक पाटील, नगरसेवक अजिंक्य साने, माजी नगरसेवक हरिभाऊ लोणारी, शिवा जाधव, प्रतीक शुक्ल यांच्यासह अन्य मान्यवरांनी चर्चेत भाग घेतला.

कोट...

गावठाण क्लस्टरचा प्रस्ताव महापालिकेने शासनाकडे पाठवला असताना आताच हे काम करण्याची गरज नव्हती. क्लस्टर डेव्हलपमेंटमुळे महापालिकेचा खर्च वाया जाणार आहे. तसेच सध्या सुरू असलेले काम थांबवावे. आणि मेरीच्या तज्ज्ञांचा सल्ला घेऊन मगच पुढे काम करावे. यासंदर्भात २४ जून राेजी कंपनीच्या दालनात बैठक घेण्यात येईल.

- आमदार देवयानी फरांदे

कोट...

गावठाण विकास प्रकल्पातील कामे पुराचा विचार करूनच करण्यात येत आहे. सखल रस्ते पाणी वाहून जाण्याच्या दृष्टिकोनातून डिझाइन तयार करून करण्यात येत आहेत. या भागात गटारीचे मलजल पावसाळी गटारीत जोडण्यात आले असून, ते वेगळे करण्याचे कामदेखील करण्यात येत आहे. त्यामुळे सराफ बाजारात सरस्वती नाल्यामुळे निर्माण होणारा प्रश्नही थांबणार आहे.

- प्रकाश थविल, सीईओ, स्मार्ट सिटी कंपनी

---------

छायाचित्र १७पीएचजेयु १०७

तसेच आर फोटोवर १७ देवयानी फरांदे

===Photopath===

170621\17nsk_68_17062021_13.jpg

===Caption===

स्मार्ट सिटी कंपनीने धुमाळ चौक ते दहीपुलाच्या दरम्यान केलेल्या खोदाकामामुळे नागरीकांना अशी कसरत करत चालावे लागत आहे. (छायाचित्र राजू ठाकरे) 

Web Title: 'Flood' of controversy over smart road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.