जमीनदोस्त : येवल्यात अतिक्र मणधारकांची धांदल अतिक्र मणांवर हातोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 01:08 AM2018-04-27T01:08:58+5:302018-04-27T01:08:58+5:30
येवला : शहरातील शनिपटांगण, विंचूर चौफुली, बसस्थानकासह नगर- मनमाड रोडच्या आजूबाजूला अनेक वर्षे संसार थाटलेल्या दोनशेहून अधिक टपऱ्या, स्टॉल, अशा अतिक्रमणांवर सोमवारी येवला पालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केल्याने रस्त्याने मोकळा श्वास घेतला.
येवला : शहरातील शनिपटांगण, विंचूर चौफुली, बसस्थानकासह नगर- मनमाड रोडच्या आजूबाजूला अनेक वर्षे संसार थाटलेल्या दोनशेहून अधिक टपऱ्या, स्टॉल, अशा अतिक्रमणांवर सोमवारी येवला पालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केल्याने रस्त्याने मोकळा श्वास घेतला. मुख्याधिकारी संगीता नांदूरकर यांनी हातोडा सुरूच ठेवला आहे. गुरुवारी शनिपटांगण व गणेश मार्केट परिसरात काहींनी स्वत:हून अतिक्रमणे काढून घेतली.
अतिक्रमण करू नये अशी तंबी मुख्याधिकारी संगीता नांदूरकर यांनी दिली. रस्त्याने वाहतूक सुरळीत चालावी आणि लोकांना पायीदेखील निर्धास्तपणे चालता यावे म्हणून पालिकेच्या अतिक्रमित जागेवर राजकीय आशीर्वादाने निर्धास्तपणे थाटलेली व रहदारीला अडथळा ठरणारी सुमारे २२५ दुकाने जमीनदोस्त केली होती. मुख्याधिकारी यांनी कोणत्याही प्रकारचा पोलीस बंदोबस्त न घेता अतिक्रमण मोहीम राबविली होती. ही अतिक्रमण मोहीम सुरूच राहणार असून प्रत्येक चौकात व गल्लीबोळाने मोकळा श्वास घेण्यासाठी ही मोहीम सुरूच राहणार असल्याच्या पुनरुच्चार नांदूरकर यांनी केला आहे. प्रत्येक भागातील अतिक्रमणे स्वत:हून काढावीत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.