भक्तीचा महापूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 11:51 PM2017-09-03T23:51:06+5:302017-09-03T23:51:29+5:30
तुच सुखकर्ता... तुच दुखहर्ता..., देवा श्रीगणेशा... गणराज रंगी नाचतो... कोटी-कोटी रूपे तुझी..., आला-आला माझा गणराज आला... अशा एकापेक्षा एक सरस भक्तिगीतांनी दुमदुमलेले वातावरण अन् गणेशभक्तांची आपल्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी उसळलेल्या गर्दीमुळे रविवारी (दि.३) शहरात सायंकाळी भक्तीचा महापूर पहावयास मिळाला.
नाशिक : तुच सुखकर्ता... तुच दुखहर्ता..., देवा श्रीगणेशा... गणराज रंगी नाचतो... कोटी-कोटी रूपे तुझी..., आला-आला माझा गणराज आला... अशा एकापेक्षा एक सरस भक्तिगीतांनी दुमदुमलेले वातावरण अन् गणेशभक्तांची आपल्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी उसळलेल्या गर्दीमुळे रविवारी (दि.३) शहरात सायंकाळी भक्तीचा महापूर पहावयास मिळाला.
बुद्धीची देवता गणरायाचे दहा दिवसांपूर्वी शहरात आगमन झाले. बाप्पांच्या आगमनामुळे शहरात भक्तिमय वातावरणाची निर्मिती झालेली पहावयास मिळत आहे. रविवार सुटीचा वार, पावसाने दिलेली उघडीप आणि बाप्पाच्या विसर्जनाला उरलेले दोन दिवस यामुळे सायंकाळपासून गणेशभक्त घराबाहेर पडण्यास सुरुवात झाली होती. रात्री आठ वाजेनंतर मात्र शहरात सर्वत्र गर्दीने उच्चांक गाठला होता. बी.डी. भालेकर मैदान, अशोकस्तंभ, रविवार कारंजा, शालिमार, पंचवटी कारंजा, मेनरोड, भद्रकाली, जुने नाशिक, कॉलेजरोड, गंगापूररोड परिसरात विविध सार्वजनिक मंडळांनी गणेशोत्सवानिमित्त उभारलेले देखावे, आरास तसेच बाप्पांच्या एकापेक्षा एक देखणे रूप बघण्यासाठी भाविकांची गर्दी लोटली होती. भालेकर मैदानाकडे जाणाºया सर्व वाटांवर दुचाकीसह सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला होता. शालिमार, सीबीएस-कान्हेरेवाडी, अण्णा भाऊ साठे चौक या परिसरात बॅरिकेड लावून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मैदानावर केवळ पादचाºयांना प्रवेश दिला जात होता. मुख्य टपाल कार्यालयाच्या पुढे दुतर्फा दुचाकी-चारचाकी भाविकांनी उभ्या केल्या होत्या.