पुराच्या प्रवाहाचे नियोजन करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 09:04 PM2020-07-25T21:04:50+5:302020-07-26T00:22:50+5:30
वणी : लेंडी नाल्याला येणाऱ्या पूरपाण्याच्या प्रवाहासाठी योग्य नियोजन करावे, अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे. मागील वर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे लेंडी नाल्याला आलेल्या पुराचे पाणी रहिवाशांच्या घरात शिरून लाखो रुपयांची हानी झाली होती.
वणी : लेंडी नाल्याला येणाऱ्या पूरपाण्याच्या प्रवाहासाठी योग्य नियोजन करावे, अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे.
मागील वर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे लेंडी नाल्याला आलेल्या पुराचे पाणी रहिवाशांच्या घरात शिरून लाखो रुपयांची हानी झाली होती. रहिवाशांचा जीव टांगणीला लागल्याने त्यांना रात्र जागून काढावी लागली. जगदंबा देवी मंदिर परिसरात पावसाळ्यात येणाºया पुरामुळे या भागातील रहिवाशांना होत असलेला त्रास लक्षात घेऊन ग्रामपालिकेने छोटेखानी पूल उभारून पाणी प्रवाहित होऊन पुढे जाईल, असे नियोजन केले होते. मात्र मागील वर्षी पावसाने थैमान घातले. पुलाची उंची वाढवूनही पुराचे पाणी रस्त्यावर, रहिवाशांसह दुकानांमध्ये शिरल्याने मोठी आर्थिक हानी झाली होती.
सप्तशृंगगडावरील पर्वतरांगा व मार्कंडेय पर्वताच्या तळालगत असलेल्या भागाचे पाणी भातोडा येथील नदीत येते व ते लेंडी नाल्यात येते. गड परिसरात जोराचा पाऊस झाला की लेंडी नाल्याला पूर येतो हे समीकरण आहे. ही समस्या सोडविण्यासाठी पूरपाणी वाहून जाण्यासाठी मोकळ्या प्रवाहाची गरज आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू असले तरी ते पुरेसे व्हावेत, अशी अपेक्षा या भागातील रहिवाशांनी व्यक्त केली आहे.
----------------
गावातील बहुतांशी पावसाचे पाणी लेंडी नाल्याला जाऊन मिळते. या पाण्याच्या प्रवाहाला अवरोध होणार नाही, तसेच पाणी रस्त्यावर साचणार नाही याकडेही अग्रक्र म देणे आवश्यक आहे. सध्या जैन मंदिर ते जगदंबा मंदिर परिसरापर्यंत रस्त्याचे काम ग्रामपालिकेने हाती घेतले आहे. मात्र प्रथम या कामाला या भागातील रहिवाशांनी विरोध केला. गावातील बहुतांशी पावसाचे पाणी लेंडी नाल्याला जाऊन मिळते. या पाण्याच्या प्रवाहाला अवरोध होणार नाही, तसेच पाणी रस्त्यावर साचणार नाही याकडेही अग्रक्र म देणे आवश्यक आहे. सध्या जैन मंदिर ते जगदंबा मंदिर परिसरापर्यंत रस्त्याचे काम ग्रामपालिकेने हाती घेतले आहे. मात्र प्रथम या कामाला या भागातील रहिवाशांनी विरोध केला.