देवळ्यातील कोलथी नदीला पूरजनजीवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2019 10:55 PM2019-11-02T22:55:12+5:302019-11-02T22:55:30+5:30
खर्डे : देवळा तालुक्यात शुक्र वारी सायंकाळी व रात्री मुसळधार पाऊस झाल्याने खर्डे परिसरातील कोलथी नदीला पूर आला आहे. नदीकाठावरील आदिवासी वस्तीवरील नागरिकांचा तसेच शेतात राहणाऱ्या शेतकऱ्यांचा गावाशी संपर्कतुटला आहे. नदीवर पूल बांधण्याची जुनी मागणी असूनही या समस्येकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
देवळा तालुक्यात कोलथी नदीकाठी वास्तव्यास असलेल्या आदिवासी वस्तीवरील नागरिकांचा गावाशी संपर्क तुटला आहे .
लोकमत न्यूज नेटवर्क
खर्डे : देवळा तालुक्यात शुक्र वारी सायंकाळी व रात्री मुसळधार पाऊस झाल्याने खर्डे परिसरातील कोलथी नदीला पूर आला आहे. नदीकाठावरील आदिवासी वस्तीवरील नागरिकांचा तसेच शेतात राहणाऱ्या शेतकऱ्यांचा गावाशी संपर्कतुटला आहे. नदीवर पूल बांधण्याची जुनी मागणी असूनही या समस्येकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
तालुक्यात परतीच्या पावसाने मुक्काम ठोकल्याने हातातोंडाशी आलेल्या पिकांची नासधूस झाली आहे. त्यात शुक्रवारी पुन्हा पावसाने मुसळधार हजेरी लावल्याने त्यात आणखी भर पडल्याने शेतकरीवर्गामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसामुळे नुकसान झालेल्या शेतपिकांचे सरसकट पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी होत आहे. देवळा तालुक्यात गेल्या दहा-बारा दिवसांपासून सूर्यदर्शन झालेले नाही. ढगाळ वातावरण व पाऊस यामुळे कापणी केलेल्या मका व बाजरीच्या कणसांना कोंब फुटले आहेत. तसेच लागवडीयोग्य लाल व उन्हाळी कांद्याची रोपे वाया गेली आहेत.