लॉकडाऊन झुगारून गर्दीचा महापूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 09:31 PM2020-05-12T21:31:30+5:302020-05-12T23:25:02+5:30

पिंपळगाव बसवंत : नागरिकांच्या सोयीसाठी लॉकडाऊनच्या काळात काही अटी शिथिल करून व्यवहार सामान्य करण्याचा प्रयत्न केला; परंतु लॉकडाऊनमधील नियम झुगारून पिंपळगाव बसवंत परिसरातील मध्यवर्ती ठिकाणी गर्दीचा रोजच महापूर दिसू लागला आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

A flood of lockdown crowds | लॉकडाऊन झुगारून गर्दीचा महापूर

लॉकडाऊन झुगारून गर्दीचा महापूर

Next

पिंपळगाव बसवंत : नागरिकांच्या सोयीसाठी लॉकडाऊनच्या काळात काही अटी शिथिल करून व्यवहार सामान्य करण्याचा प्रयत्न केला; परंतु लॉकडाऊनमधील नियम झुगारून पिंपळगाव बसवंत परिसरातील मध्यवर्ती ठिकाणी गर्दीचा रोजच महापूर दिसू लागला आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पिंपळगाव बसवंत परिसरातील मुख्य परिसर निफाड फाटा, मेन रोड, शिवाजी शॉपिंग सेंटर, स्टेट बँक, यशवंतराव चव्हाण शॉपिंग सेंटर, चिंचखेड रोड परिसर, बँक आॅफ इंडिया आदी भागात किराणा माल खरेदी व इतर दैनंदिन व्यवहार करण्यासाठी चहूबाजूने नागरिक हजारोंच्या संख्येने येत असतात. या ठिकाणी जी वस्तू किंवा माल विकला जातो तो शहराच्या इतरही भागात सहज मिळतो मात्र अनेकांना निफाड फाटा, मेनरोड येथूनच माल खरेदी करण्याची सवय झाली आहे. त्यामुळे रोज किमान दोन ते तीन हजार ग्राहकांची गर्दी दर तासाला या परिसरात झालेली दिसते. या ग्राहकांसोबत त्यांच्या वाहनांचीही कोंडी होत असते. लॉकडाऊन काळात काही नियम शिथिल केले असले तरी सर्वच नियम झुगारून नागरिक खरेदीसाठी गर्दी करताना दिसून येत आहेत. पोलीस स्थानकापासून निफाड फाटा, शिवाजी शॉपिंग सेंटरपासून जुना आग्रा रोड, मेनरोड, स्टेट बँक या परिसरात फेरफटका मारला तर शहरातील लॉकडाऊन मागे घेतला की काय अशी अवस्था पाहायला मिळत आहे.




एका ठिकाणी एकाच प्रकारची पाच दुकाने ही जवळजवळ व त्या परिसरात असतील तर त्या ठिकाणी अशी दुकाने उघडण्यास परवानगी देऊ नये असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्टपणे आदेश दिले असले तरी ही सर्व दुकाने सुरू असून फिजिकल डिस्टन्सिंगचा तर पूर्णपणे बोजवारा उघडलेला आहे. कित्येक जण तोंडावर मास्क किंवा हॅन्ड ग्लोज वापरत नाही. एकाला झालेला कोरोना गर्दीला बाधित करेल याचीही भिती नागरिकांना वाटेनाशी झाली आहे.
चौकट....
पोलीस प्रशासन हतबल.....
लॉक डाऊनच्या काळात पोलीस आक्र मक होऊन नागरिकांना शिस्त लावत होते मात्र त्या विरोधातही ही आरडाओरड सुरू झाल्याने सध्या पोलिसांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली आहे. सकाळी नऊ ते सायंकाळी पाच पर्यंत पोलिस या नागरिकांना कोणत्याही सूचना देताना दिसत नाही. सायंकाळी ६ नंतर मात्र पोलीस नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना रोखत आहेत. मात्र गर्दीच्या ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगबाबत पोलिस यंत्रणाही हतबल झाली असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: A flood of lockdown crowds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक