पावसामुळे कोमेजला फुलांचा बाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 12:35 AM2017-07-25T00:35:30+5:302017-07-25T00:35:43+5:30
नाशिक : व्रतवैकल्यांच्या या काळात फुलांना मोठी मागणी असते. मात्र सध्या जिल्हाभरात सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे फुलांचे भाव कोसळले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : व्रतवैकल्यांच्या या काळात फुलांना मोठी मागणी असते. मात्र सध्या जिल्हाभरात सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे फुलांचे भाव कोसळले आहेत. त्यामुळे उत्पादक, विक्रेते, व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. फुलांचे भाव पुढे वाढतील, अशी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त केली जात आहे. दमदार पाऊस, मोठ्या प्रमाणात झालेली लागवड यामुळे फुलांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले असून, माल जास्त तर मागणी कमी त्यामुळे भाव पडले आहेत. फुलांच्या विक्रीतून खरेदीचा भावही निघत नसल्याने विक्रेते हवालदिल झाले आहेत. सध्या गुलाब, मोगरा, झेंडू या फुलांचे दर कमी झाले असून, श्रावण सुरू झाल्यानंतर कदाचित भाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नाशिकला मखमलाबाद, दरी, मातोरी, गंगापूर, अहमदाबाद (नवसारी) येथून गुलाब, झेंडू, लिली अशी सर्वच प्रकारची फुले येतात. यंदा पाऊस चांगला होत असल्याने फुलांचे भरघोस पीक आले आहे. दीप अमावास्या, श्रावण यामुळे फुले, बेल, तुळशी, दुर्वा आदींची मागणी वाढणार आहे.
असे आहेत फुलांचे तुलनात्मक बाजारभाव
फुलाचा प्रकारमागील वर्षीचे भाव आजचे भाव
छोटा गुलाब गड्डा१० ते ३० रुपये२ ते ६ रुपये
टाटा गुलाबचा गड्डा५० ते ७० रुपये१२ ते २० रुपये
टॉप गुलाबचा गड्डा७० ते ८० रुपये२० ते २५ रुपये
मोगरा६०० रुपये३०० ते ४०० रुपये
मोगऱ्याचा गजरा१५ ते २५ रुपये प्रति१० ते १५ रुपये
झेंडू३०० ते ४०० रुपये१०० ते २०० रुपये
निशिगंधा२४० ते २५० रुपये१२० ते १६० रुपये
लिली बंडल२० रुपये८ ते १० रुपये
जास्वंदी१०० रुपये पावशेर५० ते ६० रुपये
तुळस२०० रुपये किलो६० ते ७० रुपये
दुर्वा२० रुपये जुडी५ रुपये जुडी