गिरणा नदीला पूरपाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 11:17 PM2021-09-13T23:17:38+5:302021-09-13T23:18:18+5:30
लोहोणेर : चणकापूर धरणक्षेत्रात व कळवण तालुक्यातील गावांमध्ये गेल्या दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे गिरणा नदीच्या पात्रातील पाण्यात वाढ झाली असून गिरणामाई सोमवारी दुपारपासून दुथडी भरून वाहते आहे.
लोहोणेर : चणकापूर धरणक्षेत्रात व कळवण तालुक्यातील गावांमध्ये गेल्या दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे गिरणा नदीच्या पात्रातील पाण्यात वाढ झाली असून गिरणामाई सोमवारी दुपारपासून दुथडी भरून वाहते आहे.
यंदाच्या वर्षी ऑगस्ट महिना उलटूनही गिरणा नदीच्या उगमस्थान असलेल्या सुरगाणासह कसमादे पट्ट्यात समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे ऐन पावसाळ्यातसुद्धा गिरणा नदीला पुराचे पाणी वाहून गेले नाही. मात्र गेल्या दोन दिवसांत सुरगाणा तालुक्यात व गिरणा नदीच्या उगमस्थानी केमच्या डोंगर परिसरात व कळवण तालुक्यातील सततधार पावसामुळे गिरणा नदीच्या पात्रात पाण्याची वाढ झाल्याने गिरणा नदी दुथडी भरून वाहताना दिसल्याने स्थानिकांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान गिरणा नदीपात्रात पाणी पातळी वाढल्याने ते पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.