पुराच्या पाण्याचा वेढा; धार्मिक विधी रस्त्यावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:16 AM2021-09-23T04:16:16+5:302021-09-23T04:16:16+5:30
गोदावरीला आलेल्या पुरामुळे नाशिकला देवदर्शनासाठी तसेच कुटुंबातील दिवंगत व्यक्तींचे श्राद्ध घालण्यासाठी आलेल्या भाविकांची काहीकाळ गैरसोय झाली होती. सकाळी भाविक ...
गोदावरीला आलेल्या पुरामुळे नाशिकला देवदर्शनासाठी तसेच कुटुंबातील दिवंगत व्यक्तींचे श्राद्ध घालण्यासाठी आलेल्या भाविकांची काहीकाळ गैरसोय झाली होती. सकाळी भाविक मंदिर गंगाघाट परिसरात मिळेल त्या जागेवर थांबून पावसापासून बचाव करत असल्याचे दिसून आले. रामकुंडाबाहेर पुराचे पाणी वाहत असल्याने धार्मिक विधीसाठी आलेल्यांना कपालेश्वर मंदिर रस्त्यालगत पिंडदान पूजन करावे लागले तर नंतर गुडघाभर पाण्यात नदीपात्रात अस्थिविसर्जन करण्यासाठी जावे लागत होते.
गोदावरीला पुराचे पाणी कायम असल्याने रामकुंडाच्या बाहेर तसेच दुतोंड्या मारुतीसमोरील मोकळ्या पटांगणात उभे राहून पायऱ्यांवर पिंडदान करावे लागले, तर दशक्रियासाठी आलेल्या अनेक भाविकांना पुरामुळे पाण्यात जाऊन अस्थिविसर्जन करावे लागत होते. यासाठी त्यांना पुराच्या पाण्यात पोहणाऱ्या युवकांची मदत घ्यावी लागली.