विल्होळीत दोन कं पन्यांना आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 11:02 PM2019-04-06T23:02:10+5:302019-04-06T23:02:37+5:30
विल्होळी : गावाच्या शिवारात अंबड-बिल्लोरी रस्त्यावरील असलेल्या दोन कंपन्यांना अचानकपणे आग लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. अग्निशमन दलाने वेळीच धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळविले. अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी उशिरा पोहचल्याने आगीने रौद्रावतार धारण केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
विल्होळी : गावाच्या शिवारात अंबड-बिल्लोरी रस्त्यावरील असलेल्या दोन कंपन्यांना अचानकपणे आग लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. अग्निशमन दलाने वेळीच धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळविले. अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी उशिरा पोहचल्याने आगीने रौद्रावतार धारण केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
होळी परिसरातील अंबड-बिल्लोरी रस्त्यावरील ए.आर. व स्क्रॅप जंक्शन या कंपन्यांच्या परिसरातील साहित्य पेटल्याची घटना घडली. सकाळच्या सुमारास उघड्यावर नैसर्गिक विधीसाठी गेलेल्यांपैकी अज्ञात इसमाने धूम्रपान करताना जळती आगकाडी अथवा बिडी, सिगारेटचे थोटके खाली फेकून दिल्यामुळे वाळलेले गवत पेटत-पेटत दोन्ही कंपन्यांच्या आवारापर्यंत पोहचले.
यावेळी कंपन्यांच्या आवारात असलेल्या टायरसारख्या टाकाऊ साहित्याने पेट घेतल्याने आगीने क्षणार्धात रौद्रावतार धारण केला. यावेळी परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न सुरू केला.
घटनेची माहिती अग्निशमन दलाला कळविल्यानंतर सिडको उपकेंद्राचा बंबासह जवान घटनास्थळी दाखल झाले. सिडको बंबाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न क रूनही आग आटोक्यात येत नव्हती, काही वेळेत सातपूरचा बंब घटनास्थळी पोहचला. त्यावेळी जवानांनी पाण्याचा मारा करत आग विझविली. अंबड औद्योगिक वसाहत घटनास्थळापासून हाकेच्या अंतरावर असून, महापालिका व लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करून या औद्योगिक वसाहतीसाठी स्वतंत्ररीत्या नवीन अग्निशमन उपकेंद्र स्थापन करण्याची गरज असल्याचे यावेळी नागरिकांनी सांगितले.विल्होळी येथे आग लागल्याची खबर आम्हास मुख्यालयाकडून ११ वाजून ४९ मिनिटांनी प्राप्त झाली; मात्र घटनास्थळ महापालिका हद्दीबाहेर असल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांची जोपर्यंत परवानगी प्राप्त होत नाही तोपर्यंत, बंब केंद्रातून काढता येत नाही. वरिष्ठांना घटनेचे स्वरूप कळवून परवानगी घेत ११ वाजून ५२ मिनिटाला आम्ही सिडको उपकेंद्रातून बंब घेऊन विल्होळीच्या दिशेने मार्गस्थ झालो. - ए. एस. सोनवणे, फायरमन