पुराच्या पाण्याने घरांना घातला वेढा; सायखेडा गोदाकाठतील रहिवाशांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2022 04:55 PM2022-07-12T16:55:55+5:302022-07-12T16:56:11+5:30
संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात गोदावरी नदीला पूर आल्याने गोदावरी नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेच्या इशारा देण्यात आला होता.
नाशिक- गेल्या चार दिवसापासून संततदार कोसळणाऱ्या पावसामुळे गोदावरी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याने यामुळे निफाड तालुक्यातील सायखेडा येथील गोदाकाठच्या रहिवाशांच्या घरांना पाण्याने वेढा घातला असल्याने येथील रहिवाशांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले असून अजूनही पूर परिस्थिती वाढल्यास आपत्ती व्यवस्थापन तसेच प्रशासन सज्ज असल्याची माहिती प्रांताधिकारी अर्चना पठारे यांनी दिली आहे.
संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात गोदावरी नदीला पूर आल्याने गोदावरी नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेच्या इशारा देण्यात आला होता. मात्र गोदावरी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने निफाड तालुक्यातील सायखेडा येथील गोदावरी नदी काठावरील रहिवाशांच्या घरांपरिसरात पाण्याने वेढा घातल्याने 200 रहिवासांना मंगल कार्यालय व शाळांमध्ये सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे.
यापुढे पूर परिस्थिती अजून उद्भभवल्यास याकरता आपत्ती व्यवस्थापन विभाग व महसूल विभाग सज्ज आहे. तरी सायखेडा व चांदोरी या गावांत पूर परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांनी सावधान गिरी बाळगावी असे आवाहन देखील यावेळी करण्यात येत असून घरोघरी जाऊन नागरिकांना स्थलांतर होण्याचे आव्हान प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.