सरकारवाड्यात साचले पूरपाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 12:13 AM2021-09-24T00:13:33+5:302021-09-24T00:14:27+5:30
नाशिक : नाशिक शहरात सद्या सतत पडत असलेल्या पावसामुळे व दोन दिवसांपासून आलेल्या पुरामुळे, तसेच जुने काही नाले चोकप होऊन त्याचे साचलेले पाणी उलट दिशेने येत असल्याने ३०० वर्षांपूर्वीच्या पेशवेकालीन सरकारवाड्याच्या तळघरात आणि वाड्यातील चौकात पूरपाणी साचले आहे. हे दुर्गंधीयुक्त पाणी काढण्याकरिता शासनाच्या पुरातत्व विभागाने नाशिक महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाकडे निवेदन दिले आहे.

सराफ बाजारातील १८ व्या शतकातील प्राचीन पेशवेकालीन सरकारवाड्याचे जतन करण्याकरिता शासनाच्या पुरातत्व विभागाकडून दुरुस्तीचे काम सुरू आहे. या सरकारवाड्याच्या लगतच गेल्या काही महिन्यांपासून नाशिक महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाकडून गटार दुरुस्तीचे काम केले जात आहे. त्याचप्रमाणे जिल्हा व शहरातील सतत पडत असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीला पूर आल्याने व मनपाची ड्रेनेज लाईन व सरकारवाड्याची पाईप लाईन काही इंचांनी खाली-वर असल्यामुळे ड्रेनेज व पुराचे पाणी रिव्हर्स येऊन सरकारवाड्याच्या तळघरात व वाड्यातील मुख्य चौकात जमा झाले आहे.
हे दुर्गंधीयुक्त पाणी गेल्या दोन दिवसांपासून तसेच साचलेले असल्याने दुर्गंधी निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे या साचलेल्या पाण्याचा निचरा करण्याकरिता नाशिक महानगरपालिकेकडे पुरातत्व विभागाने पत्र पाठविले आहे.