फरशी पूल बनले धोकेदायक !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 09:44 PM2020-07-23T21:44:42+5:302020-07-24T00:23:21+5:30
कळवण : मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे चणकापूर धरणातून सोडण्यात आलेल्या हजारो क्यूसेस पूरपाण्यामुळे धरणाखालील पुलाचा भराव वाहून गेला आहे. त्यामुळे गिरणा नदीवर असलेला पूल धोकादायक बनला आहे. चणकापूर धरणावर चणकापूर येथून जाताना म्हशाड नाल्यावरील फरशी पूलदेखील धोकादायक झाला असून, पाटबंधारे विभागाकडून दुर्लक्षित होत आहे.
कळवण : मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे चणकापूर धरणातून सोडण्यात आलेल्या हजारो क्यूसेस पूरपाण्यामुळे धरणाखालील पुलाचा भराव वाहून गेला आहे. त्यामुळे गिरणा नदीवर असलेला पूल धोकादायक बनला आहे. चणकापूर धरणावर चणकापूर येथून जाताना म्हशाड नाल्यावरील फरशी पूलदेखील धोकादायक झाला असून, पाटबंधारे विभागाकडून दुर्लक्षित होत आहे.
कोट्यवधी रुपये खर्च करून सार्वजनिक बांधकाम विभागाने मजबूत पुलाची शास्रशुद्ध पद्धतीने बांधणी केली. मात्र पूरपाण्याच्या प्रवाहामुळे पुलासाठी टाकण्यात आलेला भराव व पुलाचा काही भाग वाहून गेल्यामुळे पुलाच्या दुरुस्तीची मागणी वाहनधारकांसह परिसरातील नागरिकांनी केली आहे.
चणकापूर परिसरातील नागरिकांना जीव मुठीत घेऊन पुलावरून प्रवास करावा लागत आहे. वाहनचालकांना कसरत करत वाट काढावी लागत आहे. चणकापूर भागातून कनाशी भागात जाण्यासाठी अभोणामार्गे अधिक अंतर पडत असल्यामुळे कमी वेळात व कमी अंतरात कनाशी गाठण्यासाठी धरणाखालील रस्ता हा जवळचा आहे. त्यामुळे पुलावरील वर्दळ वाढली होती. शिवाय चणकापूर येथे पर्यटनासाठी येणारे पर्यटक अर्जुनसागर (पुनंद), भेगू, सापुतारा येथे जाण्यासाठी या पुलाचा वापर करतात. चणकापूर धरणातून आवर्तन सोडल्यानंतर परिसरातील पर्यटक चणकापूर धबधबा परिसरात गर्दी करतात. या धबधब्यावर जाण्यासाठी पुलाचा मार्ग सोयीस्कर ठरतो. एकदिवसीय सहलीसाठी तालुक्यातील पर्यटकांची पहिली पसंती चणकापूर असते. निसर्गाचे वरदान लाभलेला हा परिसर पावसाळ्यात व धरणातून आवर्तन सोडण्यात आल्यानंतर निर्माण होणाऱ्या धबधब्यामुळे आकर्षणाचे केंद्र ठरतो.
तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी चणकापूर धरणातून गिरणा नदीपात्रात पाणी सोडल्याने धबधब्यांचे सौंदर्य जवळून न्याहाळता येते. कनाशीकडून येणाºया रस्त्यावर घनदाट वृक्षराई पर्यटकांना नेहमीच खुणावत असते.
उन्हाळ्यात येथे चौपाटी व वनभोजनाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक येतात. त्यामुळे धरणाखालील पूल पर्यटनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. मात्र सद्य:स्थितीत परिसरातील गिरणा नदीवरील पुलाची दुरवस्था झाल्याने व पुलाचा काही भाग वाहून गेल्याने अपघाताला निमंत्रण मिळत आहे. संबंधित विभागाने तत्काळ कार्यवाही करण्याची मागणी केली जात आहे.