स्वामी प्रभूपाद यांना पुष्पांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 12:23 AM2019-11-13T00:23:22+5:302019-11-13T00:23:43+5:30
इस्कॉन मंदिरात गेल्या पंधरवड्यापासून सुरू असलेला दीपोत्सवात गुरुवारी (दि.३१) इस्कॉनचे संस्थापक भक्तिवेदांत स्वामी प्रभूपाद यांना पुण्यतिथीनिमित्त पुष्पांजली अर्पण करण्यात आली.
नाशिक : इस्कॉन मंदिरात गेल्या पंधरवड्यापासून सुरू असलेला दीपोत्सवात गुरुवारी (दि.३१) इस्कॉनचे संस्थापक भक्तिवेदांत स्वामी प्रभूपाद यांना पुण्यतिथीनिमित्त पुष्पांजली अर्पण करण्यात आली.
इस्कॉन मंदिरात शरद पौर्णिमेपासून दीपदान सोहळा सुरू असून, याठिकाणी रोज दीपदान व आरती सोहळा जल्लोषात साजरा केला जात आहे. संपूर्ण कार्तिक महिन्यात म्हणजेच १३ आॅक्टोबर ते १२ नोव्हेंबरपर्यंत मंदिरात रोज सकाळी ८.१५ वाजता व सायंकाळी ७.३० वाजता दामोदर अष्टकम व दीपदान असे कार्यक्रम सुरू आहेत. यात गुरुवारी (दि.३१) इस्कॉन संस्थेचे संस्थापाकाचार्य भक्तिवेदांत स्वामी प्रभूपाद यांना पूण्यतिथीनिमित्त पुष्पांजली अर्पण करून त्यांची आरती करण्यात आली. त्यानंतर स्वामीजींना नैवेद्य दाखवून उपस्थित सर्वांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
भक्तिवेदांत स्वामी प्रभूपाद यांनी वयाच्या ७०व्या वर्षी अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे जाऊन इस्कॉनची स्थापना केली होती. गुरुंच्या मार्गदर्शनानुसार पाश्चात्य देशांमध्ये भारतीय संस्कृती आणि शास्त्राचा प्रचार-प्रसार करण्याच्या उद्देशाने १९६५ मध्ये स्वामी प्रभूपाद यांनी अमेरिकेत जाऊन इस्कॉनच्या कार्याला सुरुवात केल्यानंतर अवघ्या १२ वर्षांत १०८ मंदिरांची स्थापना केली.