आरास सजावट साहित्याने फुलली बाजारपेठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:20 AM2021-09-10T04:20:24+5:302021-09-10T04:20:24+5:30

नाशिक : गणरायांचे शुक्रवारी (दि. १० ) आगमन होणार असल्याने पूर्वसंधेला घरगुती गणरायांच्या आरास सजावटीसाठी आवश्यक साहित्यांनी शहरातील बाजारपेठ ...

Flower market with decorative materials | आरास सजावट साहित्याने फुलली बाजारपेठ

आरास सजावट साहित्याने फुलली बाजारपेठ

Next

नाशिक : गणरायांचे शुक्रवारी (दि. १० ) आगमन होणार असल्याने पूर्वसंधेला घरगुती गणरायांच्या आरास सजावटीसाठी आवश्यक साहित्यांनी शहरातील बाजारपेठ फुलून गेली होती. बाप्पांच्या स्वागताचा उत्साह सर्वत्र दिसून येत असून, शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या कानडे मारुती लेनमध्येही सजावट साहित्य होलसेल दरांत खरेदीसाठी भाविकांची गर्दी होत आहे.

शहरातील इतर दुकानांच्या तुलनेत काहीसे दर कमी असल्याने अनेकांकडून येथून खरेदीला प्राधान्य दिले जाते आहे. नाशिककर भाविकांकडून गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून बाजारपेठेत उत्सवाचे चैतन्य दिसून येत आहे. रविवार कारंजा, मेनरोड, दहीपूल या मुख्य बाजारपेठेसह उपनगरातील दुकानांमध्ये सजावटीचे साहित्य खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होते आहे. गणेशमूर्ती विक्रीची दुकाने थाटलेल्या ठिकाणीदेखील सजावटीचे साहित्य विक्रीसाठी उपलब्ध करून दिले आहे. आरास सजावट नेमकी काय करायची, त्यासाठी नव्या वस्तूंचा किंवा तयार साहित्याची खरेदी करण्यात ग्राहकांचा गुरुवारचा संपूर्ण दिवस गेल्याचे दिसून येत होते.

बाजारात फोमच्या कमानी आरास बनविण्यासाठी उपलब्ध असून काही विक्रेत्यांनी फुलांची सडावट करून या कमानी ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या आहेत. गोल मण्यांची माळ, मोत्यांची माळ, चंदन हार, कापडी आणि कागदी फुलांच्या माळा, लटकण यांसह लाइट्सचे मोदक यांची मांडणी दुकानदारांनी केली आहे. थर्माकोलला पर्याय म्हणून फोम शीटला मागणी वाढली आहे. फोम शीट महाग असल्याने ग्राहकांकडून कार्डशीट, गोल्डन पेपर, वेलवेट पेपरची मागणी होत असून गणरायांच्या आगमनाच्या पूर्वसंध्येला वेगवेगळ्या दुकांनामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली.

आरास साहित्याचे असे आहेत दर

चंदन माळ : ५० ते १२०० रुपये

कापडी माळ : ७० ते ८०० रुपये

गोंद्याची माळ : ३०० ते १२०० रुपये

मोत्यांचा हार : २०० ते १२०० रुपये

लटकण : २०० ते ८०० रुपये

रुद्राक्षाची माळ : ३९ ते ७०० रुपये

वस्त्र : ४० रुपयांपासून

..

Web Title: Flower market with decorative materials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.