नांदगावला फुलांची विक्र ी घटली; उत्पादक चिंतेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 10:58 PM2020-05-17T22:58:40+5:302020-05-18T00:11:38+5:30
नांदगाव : सकाळी दुकान उघडून साफसफाई करून देवाच्या फोटोला हार घातल्यानंतर, पैशांच्या गल्ल्याला फुले वाहून दैनंदिन व्यवसायाची सुरुवात करणाऱ्या शहरातील शेकडो दुकानदारांची दुकाने लॉकडाउनमुळे बंद असल्याने फुलविक्रेत्यांच्या मागे दोन महिन्यांपासून ग्रहण लागले आहे. मंदिरातल्या देवापेक्षा दुकानातल्या ‘देवां’वर अवलंबून असलेला फूलवाला आज कोमेजून गेला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

शहरात फुलांची पंधरा ते वीस दुकाने आहेत. मात्र त्यांचे ग्राहक असलेली दुकाने बंद आहेत व विवाह समारंभ नाहीत. यामुळे ८० टक्क्यांपर्यंत फुलांची मागणी घटल्याची खंत महावीर मार्गावरचे कचरू त्रिभुवन यांनी व्यक्त केली. पेट्रोलपंप, मेडिकल, किराणा या दुकानांमुळे १० ते २० टक्के फूलविक्री होत आहे. दररोज विविध दुकानांसाठी ४०० ते ४५० छोटे हार विक्री होत असत. लग्नसराईत पाच ते दहा हजारांचा व्यवसाय होत असे. मात्र यंदा तेही नाही.
भेंडी बाजार रस्त्यावरचे अण्णा बागुल यांची तिसरी पिढी या व्यवसायात आहे. त्यांची आजी पार्वताबाई बागुल यांनी १९५२ सालात फुलांचा व्यवसाय जय मल्हार या नावाने सुरु केला होता. परंतु आजसारखी परिस्थिती कधीच आली नव्हती. गेल्या वर्षी पाणी कमी होते तरी उत्पन्न निघाले. विक्र ी बºयापैकी झाली. यंदा पाणी भरपूर आहे तर विक्री नाही, असे बागुल यांनी सांगितले.
खर्च वजा जाता दररोज २०० ते ४०० रु पये नफा मिळून घरखर्च व इतर खर्च भागवला जात असे. गेल्या दोन महिन्यांपासून २० टक्के फूलव्रिकी होत आहे. असे असले तरी हेही दिवस जातील व पुन: एकदा फुलांच्या विक्रीला टवटवी येईल अशी अपेक्षा त्रिभुवन व बागुल यांनी व्यक्त केली.गुलाबाचा बाग छाटलागेल्या महिन्यातच दोन एकरच्या वर असलेला गुलाबाचा बाग गिºहाईक नसल्याने छाटावा लागला. नाग्यासाक्या धरणाजवळ त्यांची शेती असून, ते फक्त फुलांचीच शेती करतात. गुलाब, शेवंती, गिलाडा, झेंडू अशा विविध फुलांचे पीक ते घेतात. भाऊ, आई, वडील व बायका, मुले असा एकूण दहा सदस्यांचा परिवार आहे. यंदा मात्र धंद्याचा खेळच झाला, असे खेदाने बागुल म्हणाले.