‘फ्लॉवर्स-शो’ला पुष्पप्रेमींची लोटली गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 12:13 AM2018-01-29T00:13:36+5:302018-01-29T00:14:01+5:30
हजारो फुलांचे ताटवे न्याहाळताना नाशिककर एका अद्भुत दुनियेत रमले. पुणे महामार्गावरील ‘नाशिक्लब’च्या हिरवळीवर बुधवारपासून रंगलेल्या (दि.२४) ‘फ्लॉवर्स-शो २०१८’ या पुष्प प्रदर्शनाला नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या पाच दिवसीय प्रदर्शनाचा रविवारी (दि.२८) समारोप करण्यात आला.
नाशिक : हजारो फुलांचे ताटवे न्याहाळताना नाशिककर एका अद्भुत दुनियेत रमले. पुणे महामार्गावरील ‘नाशिक्लब’च्या हिरवळीवर बुधवारपासून रंगलेल्या (दि.२४) ‘फ्लॉवर्स-शो २०१८’ या पुष्प प्रदर्शनाला नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या पाच दिवसीय प्रदर्शनाचा रविवारी (दि.२८) समारोप करण्यात आला. पुष्प प्रदर्शनाचे सलग दुसरे वर्ष होते. या प्रदर्शनात गुलाबाच्या पन्नासपेक्षा अधिक प्रजाती नाशिककरांना बघावयास मिळाल्या. याबरोबरच पांढरी, स्प्रे, पर्पल पॉम, पिवळ्या रंगाच्या शेवंतीसह २२ प्रकार पुष्पप्रेमींनी येथे न्याहाळले. पिवळ्या झेंडूसह ‘क्रिस्पा’ हा वेगळा प्रकारही बघावयास मिळाला. पुष्पोत्सवाच्या दुसºया दिवशी गुरुवारी (दि.२५) या पुष्पोत्सवात शहरातील आठ शाळांच्या शेकडो विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. प्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी शहरातील विविध मान्यवरांसह पुष्पप्रेमींची गर्दी झाली होती. भारतीय प्रजातीसह विदेशी प्रजातीची ब्राझिलियन बटरफ्लाय, प्रिन्स फूल, ऐडिनियम, त्याचप्रमाणे कॅलेठ्यूला, तोरेनिया, बालसम, साल्विया, इंप्रेशन्स, असिलम, लिलियम, ट्यूलिप, ग्लॅडियस, बेगोनिया, आफ्रिकन गुलाब, जिरेनियम, डायनथस, ओरनामेंटल केल, पेन्सी, पेटूनिया, डेलिया असे असंख्य प्रकारच्या फुलांचा खजिना येथे रिता झाला.