बासरीच्या अवीट सुरांनी सजली ‘अर्पण’ मैफल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 12:06 AM2017-11-07T00:06:05+5:302017-11-07T00:22:41+5:30
भूप, देस, यमन, सारंग, जोग या रागांसह काही हिंदी सिनेगीत, भावगीत आणि भक्तिगीतांचे सादरीकरण ‘अर्पण’ या अनोख्या बासरीवादन मैफलीत करण्यात आले. गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर वेणूवंदना कलाअकादमीतर्फे रविवारी (दि. ५) परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
नाशिक : भूप, देस, यमन, सारंग, जोग या रागांसह काही हिंदी सिनेगीत, भावगीत आणि भक्तिगीतांचे सादरीकरण ‘अर्पण’ या अनोख्या बासरीवादन मैफलीत करण्यात आले. गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर वेणूवंदना कलाअकादमीतर्फे रविवारी (दि. ५) परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रवींद्र जोशी आणि त्यांच्या शिष्यांनी यावेळी बासरीवादनातून विविध गीतांचे सादरीकरण करत रसिकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी १२ महिलांनी एकत्र येत खमाज रागातून बासरीवादन करत सगळ्यांचे लक्ष वेधले. तसेच अकादमीच्या सत्तर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या वेगवेगळ्या रचनांनी प्रेक्षकांची विशेष दाद मिळवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीपाद कोतवाल तर आभार अबोली जोशी या विद्यार्थिनीने मानले. यावेळी संगीतप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जुगलबंदी
कार्यक्रमाच्या दुसºया सत्रात रवींद्र जोशी यांनी राग बागेश्री सादर केला. यामध्ये त्यांनी आलाप जोड झाला आणि रूपक आणि द्रुत तालातील गत सादर केली. कार्यक्रमाची सांगता पंडित विवेक सोनार आणि पंडित कालिनाथ मिश्रा यांच्या बासरी आणि तबला जुगलबंदीने झाली. यावेळी अकादमीतील यशस्वी विद्यार्थ्यांनादेखील मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.