उड्डाणपूल स्थगित, स्मार्ट सिटीकडून शंभर कोटी परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:15 AM2021-01-20T04:15:58+5:302021-01-20T04:15:58+5:30
याशिवाय मायको सर्कलसह इतर पूल, डीपीरोड यासाठी अडीचशे काेटी रूपयांचे कर्ज काढण्यास राज्य शासनाने परवानगी द्यावी यासाठीही आयुक्तांना शासनाकडे ...
याशिवाय मायको सर्कलसह इतर पूल, डीपीरोड यासाठी अडीचशे काेटी रूपयांचे कर्ज काढण्यास राज्य शासनाने परवानगी द्यावी यासाठीही आयुक्तांना शासनाकडे प्रस्ताव पाठवण्याची सूचना करण्यात आली आहे.
नगरसेवकांच्या प्रभागातील कामे करण्यासाठी सत्तारूढ भाजपने कर्ज काढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यास प्रशासन अनुकूल नसून विरोधी पक्ष विशेषत: शिवसेनेने विरोध केला आणि कर्ज काढून मोठ्या प्रकल्पांची कामे हेाणार नसतील तर काय उपयोग? असा प्रश्न विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केला होता. त्या पार्श्वभूमीवर सत्तारूढ भाजपने आता नवीन खेळी केली असून, मंगळवारी (दि.१९) आयुक्त कैलास जाधव यांची महापौर सतीश कुलकर्णी, स्थायी समिती सभापती गणेश गिते व सभागृह नेता सतीश सोनवणे, गटनेता जगदीश पाटील यांनी भेट घेतली.
गत वर्षी १५ सप्टेंबर रोजी झालेल्या महासभेत ठराव क्रमांक २९८ अन्वय ३१ प्रभागातील १२७ नगरसेवकांची कामे मंजूर केली आहेत. त्याबाबत प्रशासनाकडे वेळेावेळी पाठपुरावा केला, मात्र सद्य:स्थितीत महापालिकेचे उत्पन्न घटल्याने कामे करता येत नाही अशी प्रशासनाने भूमिका घेतली त्यामुळे आता नागरी कामे व्हावीत यासाठी भाजपने अशी खेळी केली आहे.
इन्फो...
प्रशासआची भूमिका आडमुठेपणाची महापौरांचा आरोप
महासभेत मंजूर कामे करूनही प्रशासन आर्थिक सबब पुढे करीत आहे. प्रशासनाचा हा हटवादीपणा असून, जाणीवपूर्वक ते विकासकामांना खोडा घालत असल्याचा आरोप महापौर सतीश कुलकर्णी यांनी केला आहे. त्यामुळे आता महापालिकेत सत्तारूढ भाजप आणि आयुक्त कैलास जाधव यांच्यात जुंपल्याचे चित्र दिसू लागले आहे.