फेसाळयुक्त पाणी : नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न एकलहरे बंधाºयात पाणवेली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 01:15 AM2018-02-07T01:15:26+5:302018-02-07T01:16:10+5:30
एकलहरे : एकलहरे वीज केंद्राला पाणीपुरवठा करण्यासाठी गोदावरी नदीपात्रात बांधण्यात आलेल्या बंधारा परिसरावरील पाण्यावर पाणवेली पसरल्याने दुर्गंधी व डासांचा उपद्रव वाढला आहे.
एकलहरे : एकलहरे वीज केंद्राला पाणीपुरवठा करण्यासाठी गोदावरी नदीपात्रात बांधण्यात आलेल्या बंधारा परिसरावरील पाण्यावर पाणवेली पसरल्याने दुर्गंधी व डासांचा उपद्रव वाढला आहे. एकलहरे वीज केंद्राला पाणीपुरवठा करण्यासाठी गोदावरी नदीपात्रात मोठा बंधारा बांधण्यात आला असून, त्याच्या आजूबाजूला एकलहरे, शीलापूर, ओढा गावाचा परिसर आहे. टाकळी येथील मनपाच्या मलशुद्धीकरण केंद्रातून नदी पात्रात दुर्गंधीयुक्त पाणी सोडले जात असल्याने ते फेसाळलेले पाणी एकलहरे येथील बंधाºयापर्यंत येते. तसेच नदी पात्रातील पाणवेली वाहून या बंधाºयापर्यंत आल्याने बंधाºयाच्या पाण्यावर सर्वत्र हिरवेगार शेवाळे पसरले आहे. त्यामुळे दुर्गंधी मोठ्या प्रमाणात वाढली असून, डासांचा उपद्रवदेखील वाढला आहे. बंधाºयावरून वाहून जाणारे फेसाळलेले पाणी हे ओढ्यापर्यंत नदीपात्रात ठिकठिकाणी साचलेले असते. त्यामुळे या परिसरातील गोदावरीच्या नदीपात्रात सर्वत्र पाण्यावर मोठ्या प्रमाणात फेस साचलेला दिसतो. मनपाने त्यांच्या हद्दीजवळील ग्रामीण भागाचा विचार करून नदीपात्रात स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
नदीपात्रातील फेसाळयुक्त पाण्याबाबत एकलहºयातील नागरिकांनी यापूर्वी आंदोलनदेखील केले आहे. मात्र दुर्गंधीयुक्त पाण्याचा प्रश्न अद्यापही सुटलेला नसून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
गैरसोय अधिक : पाणवेलींची डोकेदुखी
नदीपात्रातून वाहून आलेल्या पाणवेली आणि फेसाळयुक्त पाणी बंधाºयामुळे एकलहºयातच अडकले जाते. त्यामुळे या साठलेल्या पाण्यात डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून येते. नदीपात्रावरील टाकळी नदीच्या मलनिस्सारण केंद्रातून अपुºया प्रक्रियेमुळे फेसाळयुक्त पाणी बाहेर पडते आणि हेच पाणी नदीपात्रात मिसळत असल्याने पर्यावरणाचा प्रश्न निर्माण झालाचा दावा येथील नागरिकांना केला आहे.