लक्ष लक्ष उजळले दीप...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 01:14 AM2017-11-04T01:14:45+5:302017-11-04T01:14:52+5:30

सज्जनांचे रक्षण करीत दुष्टांचे निर्दलन करा, असा सामाजिक संदेश देणाºया त्रिपुरारी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी गंगापूर रोडवरील सोमेश्वर येथील श्री बालाजी मंदिराच्या प्रांगणात लक्ष लक्ष दिव्यांच्या प्रकाशाने बालाजी मंदिर उजळून निघाले. पारंपरिक पोशाख परिधान केलेल्या हजारो नाशिककरांनी मोठ्या संख्येने आणि भक्तिभावाने या सोहळ्यात सहभागी होऊन जवळपास एक लाखाहून अधिक दिवे प्रज्वलित केले.

The focus is on the lamp ... | लक्ष लक्ष उजळले दीप...

लक्ष लक्ष उजळले दीप...

Next

नाशिक : सज्जनांचे रक्षण करीत दुष्टांचे निर्दलन करा, असा सामाजिक संदेश देणाºया त्रिपुरारी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी गंगापूर रोडवरील सोमेश्वर येथील श्री बालाजी मंदिराच्या प्रांगणात लक्ष लक्ष दिव्यांच्या प्रकाशाने बालाजी मंदिर उजळून निघाले. पारंपरिक पोशाख परिधान केलेल्या हजारो नाशिककरांनी मोठ्या संख्येने आणि भक्तिभावाने या सोहळ्यात सहभागी होऊन जवळपास एक लाखाहून अधिक दिवे प्रज्वलित केले. या दिव्यांच्या प्रकाशाने मंदिर आणि संपूर्ण परिसर एका अनोख्या झळाळीने उजळून निघाला होता.
त्रिपुरारी पौर्णिमा, तुळशीविवाह आणि कार्तिक महोत्सव या धार्मिक कार्यक्र मांच्या त्रिवेणी सोहळ्यानिमित्त शहरभरात भाविकांची मांदियाळी आणि दीपोत्सवाचा लखलखाट दिसून आला. त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी त्रिपूर असुराचा संहाराच्या पार्श्वभूमीवर शिव मंदिरात वाती लावणे, वाती जाळणे, दीपपात्री दान करणे अशाप्रकारे ही पौर्णिमा साजरी करण्यात येते.
नाशिकमध्ये बालाजी मंदिरातही हा दीपोत्सव साजरा केला जात असून, १२ वर्षांपासून येथे दिवे प्रज्वलित करून त्रिपुरारी पौर्णिमा साजरी केली जाते. सुरुवातीला पाच हजार पणत्यांनी सुरुवात झालेल्या या दीपोत्सवात आता एक लाखाहून अधिक दिवे प्रज्वलित केले जात आहेत. यावर्षी सामाजिक कार्यकर्ते हेमंत बक्षी व गलानी देवी यांच्या हस्ते प्रथम दीपप्रज्वलन करून दीपोत्सवाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर एकामागून एक येणाºया नाशिककरांनी जवळपास ४५ डबे तेल वापरून लाखो दिवे प्रज्वलित केले, तर महिलांनी एकत्रित हजारो वाती पेटवून पूजा केली. बालाजी मंदिराचा गाभारा व मंदिराची सजावट पणत्यांनी करण्यात आली होती. हळूहळू अवघा परिसर दिव्यांच्या प्रकाशाने झळाळून निघाला. यावेळी शंकराचार्य न्यासचे अध्यक्ष आशिष कुलकर्णी, कार्यवाह प्रमोद भार्गवे, आनंद जोशी, राजाभाऊ मोगल, अशोक खोडके, नरेंद्र चांदवडकर आदी उपस्थित होते. मंदिर परिसरातील दीपरचना अवधूत देशपांडे यांनी केली होती.

Web Title: The focus is on the lamp ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.