आचाºयांकडून फराळ बनवून घेण्यावर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 12:06 AM2017-10-18T00:06:12+5:302017-10-18T00:13:09+5:30

दिवाळी सुरू झाली असून, कच्चा माल देऊन आचाºयांकडून फराळाचे पदार्थ करून घेण्याचा ट्रेंड वाढत चालला आहे. लक्ष्मीपूजनापासून अनेकांना कार्यालयीन सुट्या मिळणार असल्याने आणि पुरेसा वेळ हाती नसल्याने या पर्यायाचा स्वीकार होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. श्रम, वेळेची बचत होत असल्याने आणि आपल्या घरचेच घटक पदार्थ वापरून आपल्या नजरेसमोर फराळाचे पदार्थ तयार करून मिळत असल्याने हा पर्याय महिलावर्गात लोकप्रिय होत चालला आहे.

 Focus on making snacks from others | आचाºयांकडून फराळ बनवून घेण्यावर भर

आचाºयांकडून फराळ बनवून घेण्यावर भर

Next

नाशिक : दिवाळी सुरू झाली असून, कच्चा माल देऊन आचाºयांकडून फराळाचे पदार्थ करून घेण्याचा ट्रेंड वाढत चालला आहे. लक्ष्मीपूजनापासून अनेकांना कार्यालयीन सुट्या मिळणार असल्याने आणि पुरेसा वेळ हाती नसल्याने या पर्यायाचा स्वीकार होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. श्रम, वेळेची बचत होत असल्याने आणि आपल्या घरचेच घटक पदार्थ वापरून आपल्या नजरेसमोर फराळाचे पदार्थ तयार करून मिळत असल्याने हा पर्याय महिलावर्गात लोकप्रिय होत चालला आहे.  ठिकाठिकाणी आचारी भट्ट्या लावल्या असून सकाळपासून चिवडा, शेव, चकली, करंजी, अनारसे, कडबोळ्या, पापड्या, मठरी, लाडू असे पदार्थ बनवून घेतले जात आहेत. बनवून देण्याचे दर किफायतशीर असल्याने महिलावर्गाकडून या प्रकाराला पसंती दिली जात आहे. काही वर्षांपासून घरी फराळ बनविण्याऐवजी कच्चा माल देऊन फराळ करून घेण्याकडे महिलांचा कल वाढला आहे. त्यामुळे आचारीकडे महिलावर्गाची गर्दी वाढत आहे.  दिवाळीच्या पार्श्वभूमीवर घराघरात आवरासावर, सजावट, खरेदी आदींची धावपळ दिसून येत आहे. दिवाळीत फळालाही तितकेच महत्त्व आहे, परंतु दिवसेंदिवस वाढणाºया महागाईमुळे मुलांचे शिक्षण, किराणा, आजारपण, घरसंसार चालण्यासाठी पतीबरोबरच महिलावर्गही नोकरी करतात. त्यामुळे घरी फराळाची तयारी करणे अशक्य होऊ लागले आहे. त्यासाठी बहुतेक किराणा दुकानांसमोर आचारी फराळ साहित्य घेऊन समोरच फराळ तयार करून देत आहेत. महिला वर्गाचे कामही सोपे होत आहे.
शेव, चिवडा, शंकरपाळे, चकली यांसह विविध फराळांचे पदार्थ तयार करून घेण्यासाठी सकाळपासून सायंकाळपर्यंत महिलावर्ग मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.   सदर पदार्थ आचारी किलोच्या भावाने करून देत असल्याने वेळ आणि आर्थिक फायदा होत असल्याचे महिलांचे म्हणणे आहे. याचप्रमाणे किराणा, इंधन, वेळ, श्रम या साºयांचे गणित करून येणारा खर्च लक्षात घेता दुकाने, बचतगटांचे मेळावे आदी ठिकाणांहून फराळाचे तयार पदार्थ घेण्यावरही भर दिला जात आहे.    गरजेनुसार व आवडीनुसार अर्धा किलो ते ५ किलोपर्यंत चिवडा, चकली, शेव, करंजी आदी माल विकत घेतला जात आहे.

Web Title:  Focus on making snacks from others

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.