गायब लाइटच्या चौकशीवर आता ‘फोकस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 11:43 PM2020-01-23T23:43:04+5:302020-01-24T00:40:58+5:30

नाशिकरोड येथील क्रीडा संकुलातील चाळीस लाख रुपयांचे फोकस लाइट बेपत्ता झाल्याने त्यावरून महासभेत वादळी चर्चा झाली आणि या प्रकरणाची चौकशी करण्याचादेखील ठराव झाल्यानंतर आयुक्त राधाकृष्ण गमे यांनीदेखील हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून, यांत्रिकी विभागाचे अधीक्षक अभियंता शिवाजी चव्हाणके यांना चौकशीचे आदेश दिले आहेत.

'Focus' on missing light probe now | गायब लाइटच्या चौकशीवर आता ‘फोकस’

गायब लाइटच्या चौकशीवर आता ‘फोकस’

Next
ठळक मुद्देक्रीडा संकुलातील प्रकरण : आयुक्तांनी नेमले चौकशी अधिकारी




नाशिक : नाशिकरोड येथील क्रीडा संकुलातील चाळीस लाख रुपयांचे फोकस लाइट बेपत्ता झाल्याने त्यावरून महासभेत वादळी चर्चा झाली आणि या प्रकरणाची चौकशी करण्याचादेखील ठराव झाल्यानंतर आयुक्त राधाकृष्ण गमे यांनीदेखील हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून, यांत्रिकी विभागाचे अधीक्षक अभियंता शिवाजी चव्हाणके यांना चौकशीचे आदेश दिले आहेत.
नाशिकरोड येथील आढावनगर येथे महापालिकेने उभारलेल्या क्रीडा संकुलात चाळीस लाख रुपये खर्च करून ३६ फोकस लाइट बसवले होते. मात्र, १२ जानेवारीस अतिरिक्त आयुक्त सोनकांबळे आणि नगरसेवक प्रशांत दिवे यांनी त्याठिकाणी भेट दिली त्यावेळी लाइट गायब होते. त्याबाबत या भागातील विद्युत अभियंत्याला विचारणा केली तेव्हा त्यांनी लाइट चोरीला गेले असतील, असे सांगितले होते.
क्रीडा संकुलाची उंची सुमारे तीस फूट असून त्यात पंचवीस फुटावर जरी हे फोकस लावले असतील तर ते इतक्या उंचीवरून चोरणे अशक्य आहे, असे दिवे यांचे मत होते. त्यांनी यासंदर्भात अधीक्षक अभियंता देवेंद्र वनमाळी यांनाही सांगितले, परंतु त्यांनी जास्त चर्चा करू नका फोकस लाइट बसवून देतो, असे सांगितले असल्याचे दिवे यांचे म्हणणे आहे.
महासभेत त्यांनी हा विषय मांडताना फोकस लाइट बसविले असतील तर किमान त्याठिकाणी ड्रिल केल्याचे दिसणे आवश्यक होते, मात्र तेदेखील दिसत नसल्याने फोकस लाइट न लावताच बिल काढल्याचादेखील संशय व्यक्त केला होता.
महासभेतील या वादळी चर्चेनंतर वनमाळी यांना निलंबित करण्याऐवजी तूर्तास त्यांच्याकडील पदभार काढून घेण्याचा आणि चौकशी करण्याचा ठराव झाला असला तरी आयुक्तांनी प्रशासनामार्फत चौकशी सुरू केली आहे.

पोलिसांतील तक्रारीविषयी संशयकल्लोळ
चाळीस लाख रुपयांचे फोकस लाइट चोरीस गेले असतील तर त्याची तक्रार का केली नाही? असा प्रश्न महासभेत विचारण्यात आल्यानंतर वनमाळी यांना उत्तर देता आले नव्हते, आता मात्र प्रशासनाकडून १५ जानेवारीस तक्रार केल्याचे सांगितले जाऊ लागले आहे. जर तक्रार केली होती तर वनमाळी यांना महासभेत त्यावर उत्तर का देता आले नाही असा प्रश्न निर्माण केला जात असून, या तक्रारीबाबतही संशयकल्लोळ निर्माण झाला आहे.

Web Title: 'Focus' on missing light probe now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.