कांद्याच्या साठवणुकीवर यंत्रणेचे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 11:58 PM2017-09-11T23:58:13+5:302017-09-11T23:58:13+5:30
नाशिक : कांद्याची आवक वाढूनही शेतकºयांना बºयापैकी चांगला भाव मिळत असला तरी, या परिस्थितीचा फायदा घेत व्यापाºयांनी कांद्याची बेकायदा साठवणूक करू नये, यावर यंत्रणेचे लक्ष असल्याची माहिती जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम राधाकृष्णन् यांनी दिली.

कांद्याच्या चढ्या दरामुळे केंद्र सरकारने वेळोवेळी चिंता व्यक्त करून भाव कमी करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, याचा आढावा जिल्हा प्रशासनाकडून घेतला. भाववाढीस परिस्थितीच जबाबदार असल्याचा व त्यातून शेतकºयांना आर्थिक लाभ होत असल्याची बाब पटवून देण्यात आली होती. परिणामी कांद्याच्या साठवणुकीबाबत केंद्र सरकारने काही आदेश काढले नाहीत. मात्र गेल्या आठवड्यापासून आवक वाढून कांद्याचे दर कोसळू लागले आहेत. वाढलेल्या आवकेमुळे व्यापाºयांकडून साठवणूक होऊन बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण केली जाण्याची भीती व्यक्त केली जात असली तरी, प्रशासन या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, नवीन कांदा येईपर्यंत अशीच परिस्थिती कायम राहणार असल्याचे जिल्हाधिकाºयांनी सांगितले. कांद्याबाबत केंद्र व राज्य सरकार काय सूचना देते त्याचे पालन मात्र केले जाईल, असेही ते म्हणाले.