निमा निवडणुकीसाठी इच्छुकांवर लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 12:29 AM2018-07-03T00:29:48+5:302018-07-03T00:30:13+5:30
नाशिक इंडस्ट्रीज अॅन्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) च्या द्वैवार्षिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज विक्रीच्या दुसऱ्या दिवशीही अर्ज घेण्यास कोणीही आले नाही. मात्र निवडणुकीसाठी कोण कोण इच्छुक आहेत, याची माहिती परस्परांकडून घेतली जात आहे.
नाशिक : नाशिक इंडस्ट्रीज अॅन्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) च्या द्वैवार्षिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज विक्रीच्या दुसऱ्या दिवशीही अर्ज घेण्यास कोणीही आले नाही. मात्र निवडणुकीसाठी कोण कोण इच्छुक आहेत, याची माहिती परस्परांकडून घेतली जात आहे. उद्योजकांची अग्रणी समजली जाणारी निमा या औद्योगिक संघटनेच्या द्वैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर १ जुलैपासून उमेदवारी अर्ज विक्रीस प्रारंभ करण्यात आला आहे. १२ जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. तर २२ जुलै उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे. २९ जुलै रोजी मतदान घेण्यात येणार आहे. निमाच्या घटनेनुसार पहिल्या वर्षी मोठ्या उद्योग घटकासाठी अध्यक्षपद राखीव आहे. तर सरचिटणीस, खजिनदार प्रत्येकी एक पद, उपाध्यक्षांची २ पदे त्यात लघु आणि मोठ्या उद्योग घटकासाठी, सचिवांची २ पदे त्यात लघु आणि मोठ्या उद्योग घटकासाठी आणि सिन्नर, दिंडोरी यांसह कार्यकारिणीच्या ३४ अशा ४१ पदांसाठी ही निवडणूक घेण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या दुसºया दिवशी एकाही अर्जाची विक्री झालेली नाही.
अतिशय प्रतिष्ठेच्या व मानाच्या समजल्या जाणाºया या निवडणुकीसाठी निमाच्या ज्येष्ठ पदाधिका-यांची लवकरच बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत इच्छुकांची चाचपणी करून उमेदवार निश्चित करण्यासाठी चर्चा केली जाणार असल्याचे समजते. त्यानंतर खरे चित्र स्पष्ट होणार आहे.