लॉकडाऊन काळातही पशू-पक्ष्यांसाठी चारा, पाण्याची सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:13 AM2021-05-16T04:13:58+5:302021-05-16T04:13:58+5:30

दाभाडी :स ध्या सगळीकडे कोरोनाचा हाहाकार चालू असताना जनमानसात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. यातच प्रत्येक नागरिक स्वतः घरी ...

Fodder and water supply for animals and birds even during lockdown | लॉकडाऊन काळातही पशू-पक्ष्यांसाठी चारा, पाण्याची सोय

लॉकडाऊन काळातही पशू-पक्ष्यांसाठी चारा, पाण्याची सोय

Next

दाभाडी :स ध्या सगळीकडे कोरोनाचा हाहाकार चालू असताना जनमानसात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. यातच प्रत्येक नागरिक स्वतः घरी राहून कुटुंबाची काळजी घेत आहे. कोरोनामुळे माणसे घरातच असल्याने सभोवताली वातावरणात फिरणाऱ्या पशू-पक्ष्यांवर मात्र उपासमारीची वेळ आलेली आहे. या पक्ष्यांचा जीव वाचावा, प्राणिमात्रांवर दया असावी या उदात्त हेतूने लॉकडाऊन काळातही दाभाडीतील शिवशंभो ग्रुपने पशु-पक्ष्यांसाठी चारा-पाण्याची सोय उपलब्ध करून एक आदर्श निर्माण केला आहे.

उन्हाळा सुरू झाल्यावर पशु-पक्ष्यांना सभोवताली वातावरणात चारा-पाण्याची कमतरता भासते. पक्षीही स्वतःच्या आहारासाठी भटकंती करीत असतात. त्यामुळे पक्षी बऱ्यापैकी माणसांच्या जीवनशैलीवर अवलंबून असतात. यात यावर्षी कोरोनाने मानव राहणीमान बदलले असून, यामुळे पशुपक्ष्यांना उपासमारीची वेळ आलेली आहे. अनेक पक्षी चारा, पाण्याअभावी मृत पावलेले आढळत आहेत. याचा परिणाम पर्यावरण संतुलनावर होऊ नये, पक्ष्यांना जीवदान मिळावे, निसर्गाप्रती प्रेम असावे, माणसांची माणुसकी जिवंत राहावी यासाठी दाभाडीतील शिवशंभो ग्रुपच्या साहाय्याने हम सब ने यह ठाना, पक्षीयो को बचाना हे ब्रीद वाक्य अंगी बाळगून पक्ष्यांसाठी चारा व पाण्याची सोय करण्यात आली. गावातील अनेक ठिकाणी झाडांवर, जंगल परिसरात ही सोय करीत पशुपक्ष्यांना जीवदान देण्याचे काम या ग्रुपवरून करण्यात येत आहे. या उपक्रमासाठी शिवशंभो ग्रुपचे शाम दुसाने, पराग बोरसे, भारत निकम, विजय पगारे, गणेश डोंगरे, अविनाश अहिरे, श्रीनाथ निकम, गौरव सोनवणे, गणेश बाविस्कर, सौरभ निकम, सनी देवरे, सनी पाखले, आकाश अहिरे, विशाल निकम, चिंतन खेडकर, चेतन पगारे, रोशन पाटील, जितेंद्र निकम, शिवा पाटील, आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. (१५ दाभाडी)

-----------------------

कडक उन्हामुळे, तसेच लॉकडाऊन लागल्यामुळे पशुपक्ष्यांना चारा पाणी उपलब्ध होत नाही. चाऱ्याअभावी पक्षी मृत पावत आहेत, पक्ष्यांच्या जीवदानासाठी गावातील ठीक ठिकाणी चारा पाणी उपलब्ध करून देत आहोत.

- श्रीनाथ निकम, अध्यक्ष, शिवशंभो ग्रुप, दाभाडी

===Photopath===

150521\15nsk_15_15052021_13.jpg

===Caption===

१५ दाभाडी

Web Title: Fodder and water supply for animals and birds even during lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.