पांगरी परिसरात चारा खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2020 08:59 PM2020-05-04T20:59:22+5:302020-05-04T23:00:10+5:30
सिन्नर /पांगरी : सिन्नर-शिर्डी महामार्गालगत पांगरी शिवारात जनावरांसाठी शेतात साठवून ठेवलेला सुमारे १२ ट्रॅक्टर ज्वारी व मक्याचा चारा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास झालेल्या या दुर्घटनेत सदर शेतकऱ्याचे दीड लाखांचे नुकसान झाले आहे.
सिन्नर /पांगरी : सिन्नर-शिर्डी महामार्गालगत पांगरी शिवारात जनावरांसाठी शेतात साठवून ठेवलेला सुमारे १२ ट्रॅक्टर ज्वारी व मक्याचा चारा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास झालेल्या या दुर्घटनेत सदर शेतकऱ्याचे दीड लाखांचे नुकसान झाले आहे.
वावी-पांगरीदरम्यान शिंंदे वस्तीजवळ आनंदा देवराम पांगारकर यांची वस्ती आहे. रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास पांगारकर यांच्या घरामागे असलेल्या चाºयाच्या गंजीतून धूर निघत असल्याचे बाजूच्या वस्तीवरील शेतकऱ्यांनी पाहिले. त्यांनी लागलीच पांगारकर कुटुंबांना निरोप देत आजूबाजूच्या शेतकºयांनाही मदतीसाठी आरडाओरड करून बोलावले. वाळलेल्या चाºयाच्या गंजीने पेट घेतल्याने क्षणार्धात आगीचा मोठा भडका उडाला. जवळपास कुठेही पाण्याची सोय नसल्याने पांगारकर यांनी पांगरीचे सरपंच ज्ञानेश्वर पांगरकर यांच्यामार्फत सिन्नर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला सुचित केले. मात्र, नगरपालिकेचा मोठा बंब नादुरुस्त असल्याने लहान बंब पाठवण्यात आला. रात्री १ वाजेच्या
सुमारास पोहोचलेल्या या बंबाने
आग विझवली. मात्र, आग धुमसतच होती.
वावी पोलिसांनी या दुर्घटनेचा पंचनामा केला असून यात सुमारे दीड लाखांचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. तर सरपंच पांगारकर यांचे उपस्थितीत तलाठ्यांनी देखील नुकसानीचा पंचनामा केला आहे. पांगारकर यांचा शेतीला जोडव्यवसाय म्हणून दूध उत्पादनाचा व्यवसाय आहे. आगामी काळात चाºयाची तजवीज म्हणून त्यांनी बाहेरून विकत घेऊन हा चारा साठवून ठेवला होता. मात्र आगीने होत्याचे नव्हते केल्याने त्यांना मोठ्या टंचाईला तोंड द्यावे लागणार आहे.
--------
शेतकºयाला आर्थिक फटका
बंबातील पाणी संपल्याने व वीजपुरवठा बंद असल्याने पाण्याचा बंब पुन्हा भरण्याची सोय झाली नाही. परिणामी अग्निशमन दलाचे जवान माघारी परतले. सकाळी ९ वाजेच्या सुमारास वावीचे सहायक पोलीस निरीक्षक रणजित गलांडे घटनास्थळी आले असता चाºयाच्या गंजीतून धुमसणारी आग पाहून त्यांनी पुन्हा नगरपालिका बंबास पाचारण केले. त्यानंतर आलेल्या मोठ्या बंबाने आग पूर्णत: विझवली. मात्र तोपर्यंत सर्व चारा खाक झाला होता. पांगारकर यांनी जनावरांसाठी सहा ट्रॅक्टर कडबा, सहा ट्रॅक्टर चारा साठवून ठेवला होता. तर सहा ट्रॅक्टर मक्याच्या बिट्या (कणसे) साठवल्या होत्या. आगीने हा संपूर्ण चारा भस्मसात केला. या आगीत शेजारी असणारे पीव्हीसी पाईप, शेतोपयोगाची लाकडी औजारेदेखील जळून खाक झाली.