वणी शहरावर धुक्याची चादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 10:31 PM2020-01-02T22:31:27+5:302020-01-02T22:33:08+5:30

वणी शहरात बुधवारी सकाळच्या सुमारास दाट धुके व दवबिंदु असे नयनमनोहरी वातावरण निर्माण झाले होते. बुधवारी सकाळी सहा वाजुन पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास अचानकपणे धुक्याचे आगमन झाले संपुर्ण शहारावर धुक्याची चादर पसरली. अवघ्या दोन ते तीन फुटावरही काही दिसेनासे झाले. वाहनचालकांना वाहनांचे लाईट लावून प्रवास करावा लागला.

Fog sheet on Wani city | वणी शहरावर धुक्याची चादर

वणी शहरावर धुक्याची चादर

Next

वणी : शहरात बुधवारी सकाळच्या सुमारास दाट धुके व दवबिंदु असे नयनमनोहरी वातावरण निर्माण झाले होते. बुधवारी सकाळी सहा वाजुन पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास अचानकपणे धुक्याचे आगमन झाले संपुर्ण शहारावर धुक्याची चादर पसरली. अवघ्या दोन ते तीन फुटावरही काही दिसेनासे झाले. वाहनचालकांना वाहनांचे लाईट लावून प्रवास करावा लागला.
मात्र गुलाबी थंडी, दाट धुके व दवबिंदु असे मनमोहक वातावरण निसर्ग प्रेमीना मेजवानीच ठरली. अनेकांनी घराच्या छतावर टेरेसवर जाऊन भ्रमणध्वानीच्या कॅमेऱ्यात हे दृष्य कैद करु न अनेकांना सोशल मिडीयावर पाठविले. धुुक्याचे वातावरण आठ वाजुन तीस मिनिटापर्यंत होते. तदनंतर सुर्यनारायणाचे आगमन झाले व धुक्याचे प्रमाण काहीसे कमी झाले. नऊ वाजेनंतर हळुहळु धुके नाहीसे झाले. ज्या द्राक्षामधे पाणी उतरले अशा द्राक्षांना तडे जाण्याचा धोका दवबिंदुमुळे वाढला आहे. अशा आपत्तीसाठी कोणतीही उपाययोजना करता येत नाही. केवळ वातावरण निवळ्ण्याची प्रतिक्षा करणे एवढेच उत्पादकांच्या हातात असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

Web Title: Fog sheet on Wani city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.