लोककला ही इंटरनेटहून प्रभावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 01:11 AM2018-11-25T01:11:20+5:302018-11-25T01:12:06+5:30

जेथे अजूनही इंटरनेट पोहचत नाही तेथे पिढ्यांपिढ्यांपासून लोककला पोहचलेली असून, या भागात जनजागृती आणि जनचळवळी आणि मनोरंजनासाठी लोकसंवादाचे लोककला हे माध्यम इंटरनेटपेक्षाही अधिक प्रभावी माध्यम असल्याचे प्रतिपादन लोकगीत गायक तथा मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे संचालक डॉ. गणेश चंदनशिवे यांनी केले.

 Folk art is effective from the internet | लोककला ही इंटरनेटहून प्रभावी

लोककला ही इंटरनेटहून प्रभावी

Next

नाशिक : जेथे अजूनही इंटरनेट पोहचत नाही तेथे पिढ्यांपिढ्यांपासून लोककला पोहचलेली असून, या भागात जनजागृती आणि जनचळवळी आणि मनोरंजनासाठी लोकसंवादाचे लोककला हे माध्यम इंटरनेटपेक्षाही अधिक प्रभावी माध्यम असल्याचे प्रतिपादन लोकगीत गायक तथा मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे संचालक डॉ. गणेश चंदनशिवे यांनी केले.
सातपूर औद्योगिक वसाहतीतील नॅबच्या इमारतीत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या दोन दिवसीय केंद्रीय युवक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे होते. व्यासपीठावर विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. विजया पाटील, वित्त समिती सदस्य डॉ. संजय खडक्कर, नॅबचे सचिव गोपी मयूर, सहसचिव मुक्तेश्वर मुनशेट्टीवार आदी उपस्थित होते. डॉ. गणेश चंदनशिवे म्हणाले, आपली संस्कृती ही ‘आयटम साँग’ची नसून लोकगीतांची आहे. त्यामुळे पाश्चात्य संस्कृतीच्या आक्रमणात आपल्या मातीतील लोककला, लोकसंस्कृती, मराठी भाषा आणि संस्कृतीचे जतन करण्याची जबाबदारी आपली सर्वांची असल्याचे मत चंदनशिवे यांनी यावेळी व्यक्त केले. त्यांनी ‘नभातुनी आली अप्सरा’ तसेच ‘माझी मैना गावावर राहिली’सारखी चित्रपट व लोकगीते सदर करून युवा महोत्सवात रंग भरला. दरम्यान, अध्यक्षीय भाषणात डॉ. दिनेश भोंडे यांनी आगामी काळात विद्यापीठात ‘नाट्य व लोककला’ विद्याशाखा सुरू करण्याचे सुतोवाच केले. नाशिक विभागीय संचालक प्रा. डॉ. धनंजय माने यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन श्याम पाडेकर यांनी केले. कुलसचिव चंद्रकांत पवार यांनी आभार मानले.
आज पारितोषिक वितरण
केंद्रीय युवक महोत्सवात विद्यापीठाच्या विविध विभागीय केंद्रावरील साधारण दोनशेहून अधिक विद्याथ़्र्यांनी युवक महोत्सवात एकांकिका, नाटिका, मुकाभिनय, नकला, शास्त्रीय समूह-सुगम व पाश्चात्य गायन, हार्मोनियम, तबला, पखवाज वादन आदी स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या कलाविष्कांराचे सादरीकरण केले. या स्पर्धांचे बक्षीस वितरण रविवारी (दि.२५) होणार असून, या बक्षीस वितरण सोहळ्याने महोत्सवाचा समारोप होणार आहे. दरम्यान, या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांची ‘इंद्रधनुष्य-२०१८’ आंतरविद्यापीठीय स्पर्धेसाठी निवड होणार आहे.

Web Title:  Folk art is effective from the internet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.